माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळा तर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला शहर आणि ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये शांततेत सुरुवात झाली आहे.. विभागीय मंडळा मार्फत घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात सुमारे 25 हजार 777 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या परीक्षेला सामोरे जात आहेत.. रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूल येथे दहावीच्या परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कोकण विभागीय मंडळा मार्फत घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेकरिता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 640 हायस्कूल मधून 25 हजार 677 विद्यार्थी 114 केंद्रांवर परीक्षा देत आहेत त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 17450 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8327 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षा केंद्राबाहेर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तसेच दहावीची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी विभागीय मंडळा मार्फत अनेक पथके तयार ठेवण्यात आली आहेत जेणेकरून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये. अनेक शाळांमध्ये दहावीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले..
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळा तर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला शहर आणि ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये शांततेत सुरुवात झाली आहे
