रत्नागिरीधामणदिवी ग्रामपंचायतीमध्ये 12 ते 15 लाखाचा अपहार झाल्याचा आरोपप्रकरणी उपोषणकर्ते संदेश पेवेकर...

धामणदिवी ग्रामपंचायतीमध्ये 12 ते 15 लाखाचा अपहार झाल्याचा आरोपप्रकरणी उपोषणकर्ते संदेश पेवेकर यांचा दि. 3 मार्च 2026 पासुन खेड पंचायत समितीसमोर उपोषण सुरु

धामणदिवी ग्रामपंचायतीमध्ये 12 ते 15 लाखाचा अपहार झाल्याचा आरोपप्रकरणी उपोषणकर्ते संदेश पेवेकर यांचा दि. 3 मार्च 2026 पासुन खेड पंचायत समितीसमोर उपोषण सुरु
खेड :- तालुक्यातील धामणदिवी ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत समजली जाते. अशा या श्रीमंत ग्रामपंचायतीमध्ये लॅपटॉप, प्रिंटर, सिसी टिव्ही कॅमेरे, टि. व्हि. जीईएम पोर्टल मार्फत खरेदी केलेल्या वस्तुंचे प्रत्यक्षात खरेदीची किंमत कमी दाखवत, आणि कामांची एमबी नोंद करता अंदाजे 7 ते 8 लाखाचा अपहार झाल्याचा आरोप भूतपूर्व ग्रामपंचायत सदस्यांचा आरोप तर याप्रकरणी दोषी आढळणारे सरपंच, ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी भूतपूर्व ग्रामपंचायत सदस्य श्री.
संदेश पेवेकर यांनी खेड पंचायत समितीसमोर मंगळवार दि. 3/3/2026 पासुन आमरण उपोषण सुरु, झाल्याची माहीती उपोषणकर्ते भूतपूर्व ग्रामपंचायत सदस्य श्री संदेश पेवेकर यांनी दिली. अशी विनंती धामणदिवी ग्रामपंचायतीचे भूतपूर्व,भूतपूर्व ग्रामपंचायत सदस्य संदेश पेवेकर यांनी गटविकास अधिकारी, खेड पंचायत समिती यांना दिलेल्या लेखी पत्राद्वारे केली आहे.
धामणदेवी ग्रामपंचायतीने जीईएम पोर्टल मार्फत खरेदी केलेल्या वस्तुंच्या किंमती कमी असताना, जास्त दराची बील दाखवत वस्तु खरेदीत अपहार केल्याचा आणि ग्रामपंचायतीच्या हद्दीत झालेल्या 26 कामांपैकी 14 कामांची एमबी ची नोंद ग्रामपंचायत दफ्तरी असुन उर्वरित कामांची एमबीची नोंद करताच परस्पर बीलाची रक्कम अदा करण्यात आली आहे. याबाबत विस्तार अधिकारी श्री. जे.एन. पाटील यांनी केलेल्या चौकशीत अनियमितपणा व शासकीय निधीचा अपहार केल्याचे निदर्शनास आणुन दिले आहे. शासकीय निधीचा अपहार करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. वास्तविक सदरचा गुन्हा हा गटविकास अधिकारी, खेड पंचायत समितीच्या आदेशानुसार विस्तार अधिकारी श्री जे एन. पाटील यांनी सरपंच, ग्रामसेवक आणि एमबीवर सह्या न घेता झालेल्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करायला हवा होता. पण तसे न करता सरपंच आणि ग्रामसेवक यांना जाणूनबुजून पाठीशी घालण्याचे काम विस्तार अधिकारी आणि गटविकास अधिकारी करीत असल्याचा आरोप पेवेकर यांनी केला असून, गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी. यामागणीसाठी भूतपूर्व ग्रामपंचायत सदस्य श्री संदेश पेवेकर यांनी गटविकास अधिकारी, खेड पंचायत समिती यांना दिलेल्या लेखी निवेदन सादर केले आहे. कायदेशीर कारवाई व गुन्हा दाखल न झाल्यास मंगळवार दि. 3/3/2026 रोजी खेड पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरु केले आहे. यावेळी माझ्या जिवितास धोका निर्माण झाल्यास आपणच जबाबदार रहाल. याची दखल घेऊन अपहार प्रकरणास जबाबदार सरपंच व ग्रामसेवक यांचेवर कारवाई करावी. अशी अपेक्षा श्री. दोषी आढळणा-यांवर कायदेशीर कारवाई करावी. पाहुया आता गटविकास अधिकारी, खेड पंचायत समिती कोणती भुमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
फोटो
खेड तालुक्यातील धामणदेवी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या 12/15 लाखाचा अपहार केल्याप्रकरणी दोषी आढळणा-यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी भूतपूर्व ग्रामपंचायत सदस्य संदेश पेवेकर खेड पंचायत समितीसमोर उपोषण सुरु केले. त्याचे छायाचित्र

Breaking News

मुंबई-गोवा महामार्गावर धावत्या कारला भीषण आग; चालक गंभीर भाजला

मुंबई-गोवा महामार्गावर धावत्या कारला भीषण आग; चालक गंभीर भाजला रत्नागिरी...