रत्नागिरीवेरळ मधील श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडीयम स्कूलचे आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिम्पियाड परीक्षेत...

वेरळ मधील श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडीयम स्कूलचे आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिम्पियाड परीक्षेत उल्लेखनीय यश

खेड :- तालुक्यातील वेरळ गावातील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळ येथील विद्यार्थ्यांनी SOF आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिम्पियाड परीक्षा २०२५-२६ परीक्षेमध्ये भरघोस यश संपादन केले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या परीक्षेत इ.३री मधून कु.प्रिन्स मोरे याने
सुवर्ण पदक आणि झोनल उत्कृष्टता प्रमाणपत्र, इ.४थी मधून कु.समृद्धी नरळकर हिने ₹१०००/- किमतीची भेटवस्तू सुवर्ण पदक आणि आंतरराष्ट्रीय कांस्य पदक, इ.६ वी मधून कु. शुभ्रा कांगणे सुवर्ण पदक आणि झोनल उत्कृष्टता प्रमाणपत्र, कु.रुद्र खोपकर सुवर्ण पदक आणि झोनल उत्कृष्टता प्रमाणपत्र, कु.अथर्व धोत्रे ₹५००/- किमतीची भेटवस्तू सुवर्ण पदक आणि झोनल उत्कृष्टता प्रमाणपत्र, कु.राधा शिंदे सुवर्ण पदक आणि झोनल उत्कृष्टता प्रमाणपत्र, इ.८ वी मधून कु.रुई प्रसादे हिने सुवर्ण पदक आणि झोनल उत्कृष्टता प्रमाणपत्र तसेच कु.अस्मी जंगम हिने ₹५००/- किमतीची भेटवस्तू, सुवर्ण पदक आणि झोनल उत्कृष्टता प्रमाणपत्र प्राप्त केले. या सर्व विद्यार्थ्यांनी केलेले परिश्रम, तयारी आणि चिकाटीचे कौतुक करण्यात आले. परीक्षेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने मेहनतीमुळे मौल्यवान अनुभव मिळाला असून तो त्यांच्या भविष्यात नक्कीच उपयोगी ठरेल.
या सर्व विद्यार्थ्यांना सौ. शोनाली कांगणे आणि सौ. नम्रता दिवेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष श्री.सुयश पाष्टे, संस्था शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन श्री. उदय शेटवे, खजिनदार श्री.दिग्विजय इंदुलकर,प्रशालेचे प्राचार्य डॉ.एस.एस.अली यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Breaking News

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पा मध्ये पालकमंत्री डॉ.उदय सामंतांची बल्ले बल्ले

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पा मध्ये पालकमंत्री डॉ.उदय सामंतांची बल्ले बल्ले.....

जिष्णू देव वर्मा बनले महाराष्ट्राचे नवे राज्यपाल.

👉केंद्र सरकारने देशातील 9 राज्यांच्या राज्यपाल आणि काही...