रत्नागिरीजागतिक महिला दिनी विद्यार्थिनींच्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाला सौ.वर्षाताई ढेकणेंचे मोलाचे सहकार्य

जागतिक महिला दिनी विद्यार्थिनींच्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाला सौ.वर्षाताई ढेकणेंचे मोलाचे सहकार्य

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप महिला मोर्चा दक्षिण रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्ष तथा रत्नागिरी नगर परिषदेच्या कार्यतत्पर नगरसेविका सौ.वर्षाताई ढेकणे यांच्या पुढाकाराने व भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण व रत्नागिरीचे कर्तुत्वान सुपुत्र तथा रविंद्रजी चव्हाण साहेबांचे स्वीय्य सहाय्यक अनिकेतदादा पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाने
आयफर व डॉ.जे एस केळकर मेमोरियल फाउंडेशनच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील व कौशल्य विकास आधारित विविध अभ्यासक्रम/ प्रशिक्षण कार्यक्रम यात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या सुमारे 50 हून अधिक विद्यार्थिनींना शैक्षणिक आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले.
यावेळी आयफरचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ.ह्रषिकेश केळकर, संचालक श्री.अनिरुद्ध फळणीकर ,गीतांजली लेले आदींनी सौ.वर्षाताई तसेच रवींद्रजी चव्हाण साहेब व अनिकेतदादा पटवर्धन यांचे विशेष आभार मानले व संस्थेतर्फे सौ.वर्षाताईंना आभाराचे पत्र देखील सुपूर्द करण्यात आले.
त्यावेळी भाजपा रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे, जिल्हा चिटणीस तथा पदवीधर प्रकोष्ठ चे संयोजक मनोज पाटणकर, रत्नागिरी नगर परिषदेच्या नगरसेविका मानसीताई करमरकर ,महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस नपुराताई मुळ्ये, महिला मोर्चा, माजी जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या ताई जठार, महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्तीताई दळी तसेच भाजपा रत्नागिरी शहरातील पदाधिकारी तसेच याप्रसंगी रत्नागिरी महिला मोर्चा तर्फे महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित विविध कार्यक्रम देखील त्यावेळी चालू असल्याने शहरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Breaking News

स्त्री शक्तीचा जागर: पटवर्धन हायस्कूलमध्ये ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा.

येथील भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये ७ मार्च रोजी...

सिंधुरत्न समृद्ध योजनेला मुदतवाढ

सिंधुरत्न समृद्ध योजनेला मुदतवाढ--* सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे आणि...