प्रशासकीय कामाच्या व्यापातून विरंगुळा मिळावा आणि कर्मचारी-पदाधिकाऱ्यांमधील समन्वय वाढावा या उद्देशाने दरवर्षी होणारे जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांचे दोन दिवसीय ३० वे वार्षिक स्नेहसंमेलन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिषद भवन, रत्नागिरी येथे झाले. आज दोन दिवसीय कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांच्या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत उपस्थित होते. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी विजेत्यांना पारितोषिक प्रदान करुन, त्यांचे अभिनंदन केले.
या सोहळ्याला व्यासपीठावर जिल्हाधिकारी श्री.मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.परीक्षित यादव, जिल्हापरिषद सदस्य विलास चाळके, महेश उर्फ बाबू म्हाप, प्रकाश रसाळ, गुहागर सभापती प्रणव पोळेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
