*रत्नागिरी सह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहाने साजरी करण्यात आली. ईद चा विशेष नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी विविध मशीदीं मध्ये मोठी गर्दी केली होती..
पवित्र रमजान या रोजे म्हणजेच उपवासाच्या महिन्याचे 30 रोजे पूर्ण झाल्याने शुक्रवारी सायंकाळी उशिरा चंद्र दर्शन झाल्याने आज शनिवारी सर्वत्र रमजान ईद उत्साहाने आनंदाने आणि पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. विविध मशिदीं बाहेर मुस्लिम समाजातील अनेकांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या..
पालकमंत्री डॉ उदय सामंत सह अनेक नेते मंडळींनी मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
