रत्नागिरीशिक्षणाची पंढरी आता होणार ‘निवासी’; कारभाटले विद्यालयाच्या नूतन वसतिगृहाचे स्वप्न साकार

शिक्षणाची पंढरी आता होणार ‘निवासी’; कारभाटले विद्यालयाच्या नूतन वसतिगृहाचे स्वप्न साकार

शिक्षणाची पंढरी आता होणार ‘निवासी’; कारभाटले विद्यालयाच्या नूतन वसतिगृहाचे स्वप्न साकार
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील स्वप्नांना मिळणार नवे आकाश; भूमिपूजन सोहळा उत्साही वातावरणात संपन्न
संगमेश्वर (प्रतिनिधी): कार्यक्रमांची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. रोहिदास पोमेंडकर वं मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन वं प्रतिमा पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी प्रशालेतील विध्यार्थीनी ईशस्तवन वं स्वागतपद्य सादर केले. यानंतर उपस्थित मान्यवरांचे यथोच्छीत सत्कार पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.या कार्यक्रमाच्या औचित्याने प्रशालेतील इयत्ता ९ वितील मयंग मिलिंद पवार यांने अतुलनीय शौर्य वं प्रसंगावधान तसेच समाजसेवक श्री. राजुशेठ तांबे यांच्या सहकार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. समीर अत्तार यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी श्रृंगारपूर
चे सरपंच श्री.विनोद पवार, श्री. राजुशेठ पोमेंडकर यांनी मनोगते व्यक्त केली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत सुरक्षित निवासाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कारभाटले येथे उभारण्यात येणाऱ्या नूतन नियोजित वसतिगृहाच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. हा सोहळा केवळ एका इमारतीचा प्रारंभ नसून, परिसरातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा भक्कम पाया मानला जात आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणे शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, दुर्गम भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची दैनंदिन गैरसोय दूर व्हावी आणि शिक्षणासाठी सुरक्षित निवासी व्यवस्था निर्माण व्हावी, या उदात्त संकल्पनेतून हा प्रकल्प साकार होत आहे. अभ्युदय शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या पुढाकारातून या वसतिगृहाचे नियोजन करण्यात आले असून, परिसरातील ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.
या मंगलप्रसंगी श्री. दत्ताराम लाखन संस्थेचे पदाधिकारी व संचालक श्री. रोहिदास पोमेंडकर, श्री. बाळू होडे, श्री. सुभाष पवार, श्री. विनय होडे, श्री. सुभाष होडे आणि सौ. शर्मिला पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच नायरी येथील दानशूर व थोर समाजसेवक श्री. मोहिद्दीन जैनुद्दीन पाटणकर यांनी विशेष निमंत्रित राहून भूमिपूजन केले. शैक्षणिक कार्यास मोलाचे पाठबळ दिले.या भूमिपूजन सोहळ्याचे नियोजन आणि परिश्रम
स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नबील शेठ तांबू त्यांची कार्यकारिणी , श्री राजुशेठ पोमेंडकर व त्यांची कार्यकारिणी, तसेच माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. संतोषजी गुरव आणि त्यांची कार्यकारणी तसेच श्री राहुल गुरव, श्री प्रदीप सोलकर,जयेश सावंत, श्रीराम कदम, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. धनाजी बेंद्रे त्यांचे सर्व सहकारी सर्व सहकाऱ्यांनी यांनी केले.संपूर्ण कार्यकमासाठी उत्कृष्ट मंडप व व्यासपीठ नियोजन श्री. विजय मालप व त्यांचे सर्व सहकारी यांनी केले.
या प्रसंगी परिसरातील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सरपंच, पोलीस पाटिल, प्रशालेचे माजी मुख्याध्यापक सुरेश पातेरे ,माजी परिचर दत्ताराम गोवळकर,कोंडउमरे गावचे सुपुत्र कॅप्टन श्री. अर्जुन लाड साहेब, घरडा केमिकल चे नितीन लाड, विविध ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी व सदस्य ,माजी विद्यार्थी, पालक आणि परिसरातील दशक्रोशीतील संस्थापक अध्यक्ष कै.विलासदादा होडे यांचे हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उभारण्यात येणाऱ्या या वसतिगृहामुळे भविष्यात अनेक ग्रामीण कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रकाश गांधी आणि श्री. समीर अत्तार यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत केले, तर श्री. विनय होडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. नूतन वसतिगृहाच्या भूमिपूजनामुळे कारभाटले पंचक्रोशीच्या शैक्षणिक इतिहासात नवे पर्व सुरू झाले असून, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना आता भक्कम ‘निवासी’ आधार मिळणार आहे.

Breaking News