📢 शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे आवाहन 📢
कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे बोगस व निकृष्ट खते, किटकनाशके व औषधांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानातील बदल, अनियमित पाऊस, वाढलेले तापमान व किड-रोगांचे प्रमाण वाढल्याने शेती व मच्छीमारी दोन्ही क्षेत्रांवर गंभीर परिणाम होत आहेत.
या सर्व गंभीर प्रश्नांवर चर्चा करून पुढील लढ्याची दिशा ठरविण्यासाठी शेतकरी सभा आयोजित करण्यात आली आहे.
🗓 शनिवार दिनांक: १८ एप्रिल २०२६
⏰ वेळ: सकाळी १०:०० वाजता
📍 स्थळ: बालाजी मंगल कार्यालय, नाचणे रोड, रत्नागिरी
या सभेमध्ये बोगस औषध कंपन्यांवर कारवाई, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, तसेच हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
👉 रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आंबा उत्पादक, काजू उत्पादक व मच्छीमार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
आयोजक
श्री. प्रकाश (बावा) शंकर साळवी,
उपाध्यक्ष, कोंकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादके विक्रेते सहकारी संस्था.
श्री. बाळ माने ( माजी आमदार),
चेअरमन, रत्नागिरी तालुका खरेदी विक्री संघ, रत्नागिरी
