रत्नागिरीसहयाद्री स्पर्धा परीक्षेत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी,सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

सहयाद्री स्पर्धा परीक्षेत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी,सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

सहयाद्री स्पर्धा परीक्षेत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी,सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

खेर्डी चिंचघरी (सती) येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेने शैक्षणिक गुणवत्तेची नवी उंची गाठत स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच स्पर्धा परीक्षांची सवय लागावी यासाठी विशेष नियोजन केले जाते. यामध्ये नियमित सराव परीक्षा, मार्गदर्शन वर्ग, तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास करणारे उपक्रम विद्यालयात नियमित राबविण्यात येतात.
सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय आमदार शेखरजी निकम साहेब यांच्या दूरदृष्टीतून व कार्याध्यक्ष श्री. अनिरुद्ध निकम सर यांच्या
मार्गदर्शनाखाली सह्याद्री कॉम्पिटिटिव्ह अकॅडमीद्वारे आयोजित ‘सह्याद्री स्पर्धा परीक्षा 2026’ मध्ये विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी केवळ उत्तीर्ण होण्यापुरतेच न थांबता उच्च गुण मिळवत शाळेचा लौकिक वाढवला.या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संस्थेचे अध्यक्ष विद्यमान आमदार माननीय श्री .शेखरजी निकम सर , कार्याध्यक्ष माननीय अनिरुद्ध निकम सर, सेक्रेटरी श्री महेश महाडीक सर व संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक वृंदांच्या उपस्थितीत संपन्न झाला . यामंध्ये इ .४थी मधील दुर्वांक अविनाश शिंदे हा संस्था स्तरावर तृतीय क्रमांकाचा व शाळा स्तरावर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तर इयत्ता तिसरी मधूनअमन स्वप्निल कांबळे हा संस्था स्तरावर तिसरा व शाळा स्तरावर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तर आयुष भारत मोरे हा संस्था स्तरावर पाचवा व शाळा स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे .यावेळी विद्यार्थ्याना त्याच्या पालकांनसोबत प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून गौरविण्यात आले .
यावेळी शिक्षकवृंद, पालक तसेच मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या यशामागे शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि विद्यार्थ्यांची मेहनत महत्त्वाची ठरली आहे. शाळेने घेतलेल्या या उपक्रमामुळे इतर विद्यार्थ्यांमध्येही स्पर्धा परीक्षांबाबत उत्साह निर्माण झाला असून भविष्यात आणखी मोठे यश मिळवण्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे

Breaking News