रत्नागिरीमहाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळमधुमित्र’ व ‘मधुसखी’ पुरस्कारासाठी ४ मे पर्यंत...

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळमधुमित्र’ व ‘मधुसखी’ पुरस्कारासाठी ४ मे पर्यंत पुरस्कारांसाठी अर्ज करा

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ
मधुमित्र’ व ‘मधुसखी’ पुरस्कारासाठी ४ मे पर्यंत पुरस्कारांसाठी अर्ज करा
रत्नागिरी, (जिमाका) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने सन २०२६ साठी ‘मधुमित्र’ व ‘मधुसखी’ पुरस्कारांसाठी नामांकन मागविण्यात येत आहेत. मधमाशीपालन व्यवसायाला चालना देणे व मधपालकांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, गेल्या तीन वर्षांपासून ही योजना राबविण्यात येत आहे. तरी इच्छुकांनी आपले अर्ज दि. ४ मे २०२६ पूर्वी संबंधित जिल्हा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन प्र. जिल्हा ग्रामोद्योग अधिकाऱ्यांनी केले आहे.

क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या यशस्वी मधपालकांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात येणार आहे. यातील एक पुरस्कार महिला मधमाळीसाठी राखीव आहे. पुरस्कारांची रक्कम अनुक्रमे प्रथम रु. ११ हजार, द्वितीय रु. ७ हजार व तृतीय रु. ५ अशी आहे.

दि. २० मे २०२६ रोजी जागतिक मधमाशी दिन निमित्त पुणे येथे आयोजित समारंभात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. नामांकन अर्ज मंडळाच्या www.mskvib.org⁠ या संकेतस्थळावर तसेच जिल्हा खादी ग्रामोद्योग कार्यालयात उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जिल्हा कार्यालय – संपर्क क्र. ८०८७६५६२१६, मधुक्षेत्रिक – ९४०४४९६६२१, संचालक, मध संचालनालय, महाबळेश्वर दू.क्र. 02168-260264.

Breaking News