यंदा ही बारावीच्या परीक्षेत कोकणची पोरं हुश्शार—
👉संपूर्ण राज्यात कोकण विभागाने 94.14 टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे—
कोकण विभागाचा 12 वीचा निकाल 94.14 टक्के–
बारावीच्या निकालात मुलींची बाजी, निकाल 93.15 टक्के.
👉पुणे — महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल आताच जाहीर केला असून यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.
संपूर्ण राज्यात कोकण विभागाने 94.14 टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे,
तर लातूर विभागाचा निकाल 84.14 टक्के इतका लागला असून तो राज्यात सर्वात कमी ठरला आहे.
इयत्ता बारावी निकालाची ठळक वैशिष्ट्ये-
- या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर क कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय. टी. आय. या शाखांसाठी एकूण 14,44,713 नियमित विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,33,058 विदयार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 12,86,843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतची टक्केवारी 89.79 आहे.
- खाजगी विदयार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 37,559 एवढी असून त्यापैकी 36,941 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 29,634 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतची टक्केवारी 80.21 आहे.
- या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 50,876 पुनर्परिक्षार्थी विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 50,346 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 18,349 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 36.44 आहे.
- या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 8,446 दिव्यांग विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8,367 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 7,579 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 90.58 आहे.
- इ.12 वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीने सवलतीचे गुण देण्याबाचत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
- सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (94.14 %) सर्वाधिक असून सर्वांत कमी निकाल लातूर विभागाचा (84.14%) आहे.
- सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 93.15 असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 86.80% आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 6.35% ने जास्त आहे.
- एकूण 153 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल 100% आहे.
कुठे पाहायचा निकाल?…
महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना आपला निकाल ‘mahahsscboard.in’ या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल. त्यासाठी वेबसाइटवरील “एचएससी परीक्षा निकाल 2026” या लिंकवर क्लिक करून आपला आसन क्रमांक आणि आईचे नाव अचूकपणे प्रविष्ट करावे लागेल.
या सोप्या पायऱ्यांचे अनुसरण करून “निकाल पहा” या पर्यायावर क्लिक करताच विद्यार्थ्यांना त्यांचा स्कोअरकार्ड सहजपणे ऑनलाइन तपासता येईल.
