रत्नागिरीजनतेच्या प्रश्नांवर आमदार किरण सामंत यांची ठाम भूमिका

जनतेच्या प्रश्नांवर आमदार किरण सामंत यांची ठाम भूमिका

जनतेच्या प्रश्नांवर आमदार किरण सामंत यांची ठाम भूमिका… आणि अपुऱ्या माहितीवर राजकारण करणाऱ्यांना सडेतोड उत्तर..

👉वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रस्ते, संरक्षक भिंती, वीज व्यवस्था, घरांचे नुकसान आणि विविध विकासकामांवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे.
पावसाळा अगदी तोंडावर असताना ही दुरुस्ती तातडीने होणे अत्यंत गरजेचे आहे .हीच भूमिका मा. किरण सामंत साहेबांनी ठामपणे मांडली.
सामान्य जनतेचे हाल होऊ नयेत,
पावसाळ्यात नागरिकांना धोका निर्माण होऊ नये आणि विकासकामे तातडीने मार्गी लागावीत यासाठी त्यांनी प्रशासनाकडे आक्रमकपणे पाठपुरावा केला.
मात्र काही पत्रकार अपुऱ्या माहितीच्या आधारावर प्रश्न उपस्थित करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते.
पण किरण भैयांनी वस्तुस्थिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती जनतेसमोर स्पष्ट करत सडेतोड उत्तर दिले.
कामाची माहिती पूर्ण नसताना टीका करणे सोपे असते,
पण संकटाच्या काळात जनतेसाठी रस्त्यावर उतरून काम करणारे नेतृत्व वेगळे असते.
वादळानंतरच्या नुकसानीची गंभीरता लक्षात घेऊन तातडीच्या दुरुस्तीची गरज त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडली आणि अपुऱ्या माहितीवर प्रश्न विचारणाऱ्यांची अक्षरशः बोलती बंद केली.
आज जनतेला दिखावा नाही,तर संकटात खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व हवे आहे.
आणि म्हणूनच जनतेचा विश्वास सतत किरण भैया सामंत यांच्या पाठीशी उभा आहे! .

साहेबांनी वाळू प्रश्नावर घेतलेली ठाम भूमिका ही सर्वसामान्य नागरिक, बांधकाम व्यावसायिक, कामगार आणि गरीब जनतेला दिलासा देणारी आहे. आज अनेक ठिकाणी कृत्रिम वाळू टंचाई निर्माण करून सामान्य लोकांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.घर बांधणाऱ्या कुटुंबांपासून ते छोट्या कामगारांपर्यंत प्रत्येकजण या प्रश्नामुळे अडचणीत सापडला आहे.अशा वेळी जनतेचा आवाज बनून प्रशासनासमोर ठामपणे भूमिका मांडणारे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष करणारे नेतृत्व म्हणजे किरण भैया सामंत!
त्यांनी मांडलेला मुद्दा हा केवळ राजकारणासाठी नसून जनतेच्या हक्कासाठी आहे.
विकासकामे थांबू नयेत, सामान्य माणसाचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण व्हावे आणि स्थानिकांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे.
“काम करणाऱ्यांवर टीका होते… पण जनतेसाठी लढणारेच खरे नेते असतात!” तेच आमचे नेते आमदार किरण भैया सामंत….

-कट्टर आमदार भैया सामंत समर्थक…

Breaking News

🙋‍♀️शिष्यवृत्ती परीक्षेत मुकुल माधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे अभिमानास्पद यश

🙋‍♀️शिष्यवृत्ती परीक्षेत मुकुल माधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे अभिमानास्पद यश-🌹मुख्य ट्रस्टी...

बुरोंडी येथे मच्छीमार जेट्टी उभारणीसाठी प्रयत्न करणार; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

बुरोंडी येथे मच्छीमार जेट्टी उभारणीसाठी प्रयत्न करणार;* मत्स्यव्यवसाय मंत्री...