नियोजित वेळेत आणि नियोजित दिवशी म्हणजे शनिवार २३ मे रोजी मी आणि पत्नी डाॕ सुप्रिया दोघांनी तिरंगा फडकवून ‘एव्हरेस्ट बेस कँप” पूर्ण केला. रात्री उणे १५ अंश सेल्सिअस तर दिवसा ४ ते ६ अंश सेल्सिअस तपमान..लोबूचे ते ‘इबीसी’ अतिशय प्रतिकूल, खडतर वातावरण, दुर्गम रस्ता, अतिशय थंड वारे मानसिक आणि शारीरिक क्षमतेची कसोटी जागोजागी घेत होते. आयुष्याच्या अर्ध्या वाटेत अशा आव्हानांना शरीर आणि मन सक्षमपणाने सामोरे जावू शकते, हे या ट्रेकवरुन अनुभवता आले…
प्रशांत सातपुते. जिल्हा माहिती अधिकारी रत्नागिरी
