उद्धव बाळा साहेब ठाकरे पक्षाच्या रत्नागिरी जिल्हा दक्षिण च्या प्रभारी अध्यक्षपदी लांजा येथील निष्ठावंत शिवसैनिक दत्ता कदम यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्रक माजी खासदार तथा पक्षाचे सचिव विनायक राऊत यांनी प्रसिद्ध केले आहे. दत्ता कदम हे एक अनुभवी राजकारणी म्हणून ओळखले जातात आणि आज तरी ते उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत हे कोणीही नाकारू शकत नाही आणि याच पार्श्वभूमीवर त्यांची प्रभारी जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ऐकीकडे अनेक जण पक्षाची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करीत असल्याने आता कट्टर आणि निष्ठावंतांना मात्र महत्त्वाची पदे मिळत असल्याने कार्यकर्त्यांना मध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे—
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.