रत्नागिरीरत्नागिरी तालुक्यातील मजगांवची लेक अमीना इब्जी ठरली इब्जी कुटुंबातील पहिली महिला MBBS...

रत्नागिरी तालुक्यातील मजगांवची लेक अमीना इब्जी ठरली इब्जी कुटुंबातील पहिली महिला MBBS डॉक्टर

रत्नागिरी तालुक्यातील मजगांवची लेक अमीना इब्जी ठरली इब्जी कुटुंबातील पहिली महिला MBBS डॉक्टर– डॉक्टर अमिनावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव—
अमीना इब्जींच्या यशाने मजगांव गावाचे नाव उजळले. आत्या फरीदा हकीम. काका अब्दुल वहाब हकीम.आणि आजोबा दाऊद हमदुले यांचा होत आहे विशेष गौरव–

👉रत्नागिरी तालुक्यातील मजगांव गावासाठी ही अभिमानाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण येथील इब्जी कुटुंबातील सुकन्या डॉ. अमीना अब्दुल मजीद इब्जी यांनी MBBS परीक्षेत घवघवीत यश मिळवून कुटुंबातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे.

👉अमीना यांनी मुंबईतील प्रतिष्ठित MGM मेडिकल कॉलेज येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या या यशामुळे केवळ कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण मजगांव गावाचे नाव कोकणात झळकले आहे.
*शैक्षणिक वारसा असलेले इब्जी
कुटुंब हे शिक्षणाला प्राधान्य देणारे कुटुंब म्हणून ओळखले जाते. अमीना यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. अब्दुल्ला इब्जी यांनी आधीच MD पदवी मिळवली असून सध्या ते DM या उच्च शिक्षणा साठी अभ्यास करत आहेत. पुढील काळात इब्जी कुटुंब रुग्णसेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याचा निर्धार व्यक्त करत आहे.
कुटुंब आणि आजोबांचा मोलाचा वाटा
या यशस्वी प्रवासात अमीना यांना आई कैसरबेगम, वडील अब्दुल मजीद आणि आत्या फरीदा हकीम यांचे खंबीर पाठबळ मिळाले.
विशेष म्हणजे अमीना यांनी आपली ही पदवी आपले आजी आजोबा पै. चांदबी इब्जी तसेच पै. महमूद इब्जी यांना समर्पित केली. संपूर्ण इब्जी कुटुंब एक-दुसऱ्याचे आधारस्तंभ असून त्यांच्या संस्कारांमुळे अमीना यांना हे यश मिळाले, असे कुटुंबियांनी सांगितले.

गावकऱ्यांकडून जंगी स्वागत आणि गौरव
अमीना यांच्या ऐतिहासिक यशाबद्दल मजगांवमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी त्यांचा यथोचित गौरव केला.

या कार्यक्रमाला मजगांव ग्रामपंचायतीचे प्रशासक फैय्याज मुकादम माजी उपसरपंच शरीफ इब्जी सामाजिक कार्यकर्ते एजाज इब्जी माजी विस्तार अधिकारी सलीम इब्जी , मुख्तार इब्जी, पोल्ट्री उद्योजक कमाल इब्जी.आदर्श शिक्षक आसिफ इब्जी ज्येष्ठ बंधू डाॅक्टर अब्दुल्ला इब्जी, त्यांच्या वहिणी डाॅक्टर खदीजा इब्जी यांच्यासह आजोबा दाऊद हमदुले , सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. सर्वांनी अमीना यांच्या पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

अमीना इब्जी यांचे हे यश मजगांवसह संपूर्ण कोकणातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...