रत्नागिरीमुंबई- गोवा महामार्गावरील मांणगाव बायपास रस्ता गणेशोत्सवापूर्वी सुरु करणार..बांधकाम मंत्री

मुंबई- गोवा महामार्गावरील मांणगाव बायपास रस्ता गणेशोत्सवापूर्वी सुरु करणार..बांधकाम मंत्री

मुंबई- गोवा महामार्गावरील मांणगाव
बायपास रस्ता गणेशोत्सवापूर्वी सुरु करणार..बांधकाम मंत्री

चिपळूणातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात,
ऑगस्टपर्यंत हा पूल ही वाहतुकीसाठी होईल खुला

👉मुंबई-गोवा महा मार्गावरील माणगाव बाह्यवळण मार्गाची एक बाजू गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन असून पनवेल ते झाराप या मुंबई -गोवा महामार्गावरील ४१७ किमी मार्गाचे चौपदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिली.
माणगाव बाह्यवळण मार्गाची लांबी ७.५ किलोमीटर असून या मार्गावर तीन उड्डाणपुल आहेत. त्यापैकी एका उड्डाणपुलाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित दोन मोठ्या पुलांची ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. हे दोन्ही पूल ३१ जुलैपर्यंत पूर्ण होतील. माणगाव बाह्यवळण मार्गाची एक बाजू गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल, असे मंत्री भोसले यांनी सांगितले.
इंदापूर बाह्यवळण मार्ग ३.५ किलोमीटर लांबीचा असून येथील उड्डाणपुलाचे ४० टक्के काम झाले आहे. हा पूल डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल. संपूर्ण बाह्यवळण मार्ग २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पनवेल ते झारप या ४४९ किलोमीटर लांबीच्या मुंबई- गोवा महामार्गापैकी ४१७ किमी चौपदरीकरण पूर्ण झाले. उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. चिपळूण शहरातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून ऑगस्टपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल. संगमेश्वर येथील सोनवी नदीवरील पुलाच्या पोहोच मार्गाची कामेही प्रगतीपथावर आहेत, असे मंत्री भोसले यांनी सांगितले.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...