आंबेड ते तळेकांटे दरम्याने मुंबई गोवा मार्गावर धुलीचे साम्राज्य पसरल्याने छोटया वाहन चालकांना समोरील काही दिसत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
तसेच मार्गावर खडी पडल्याने अनेक छोटी वाहने घसरल्याचे वृत्त आहे.
काही ठिकाणी मध्ये मध्ये कोंक्रेट चा पक्का रस्ता झाला असुन जेथील रस्ता झाला आहे त्याच्या एंडिंगला काही ठिकाणी पाच ते सहा इंचाचा कट असुन तेथे गाड्या आदळत आहेत.
याचा फटका गाडीत बसलेल्या प्रवाशांना बसत आहे. त्या शिवाय गाडीचे नुकसान होत आहे ते वेगळेच.
या विषयी आमचे संगमेश्वर प्रतिनिधी सत्यवान विचारे यांनी राष्ट्रीय महामार्गlचे अभियंता श्री, कुलकर्णी यांच्या कडे वारंवार भ्रमण ध्वनीवरून संपर्क करून हा प्रकार कानी घातला त्यावेळी आमचा डांबरी प्लॅन बंद असल्याचे कlरणं देत विषयाला बगल दिली.
कमीत कमी रस्ता कट आहे तेथे कोंक्रेट टाका अशी विनंती केली मात्र त्या ठिकाणी तात्पुरती माती टाकून तो कट सारखा करण्याचा प्रयत्न केला गेला,
पुन्हा परिस्तिथी जैसे थै आहे.
मार्गावर पडलेली खडी तात्काळ बाजूला करावी, मातीवर दिवसातून दोन वेळा पाणी मlरावे आणि ज्याठिकाणी रस्ता कट आहे तेथे कोंक्रेट टाकावे अशी मांगनी वाहन चालकातून होत आहे.