दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. डॉ उदय सामंत ह्यांनी राजभवन, मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान “दिल्ली रंगवू मराठीच्या रंगात” या संमेलन गीताचे अनावरण राज्यपाल महोदयांच्या शुभहस्ते करण्यात आले.
मराठी भाषा, साहित्य, आणि संस्कृती यांचा जागर जागतिक पातळीवर व्हावा, यासाठी हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी सांगितले.