रत्नागिरीएम. एस. नाईक हायस्कूलमध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळाचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

एम. एस. नाईक हायस्कूलमध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळाचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

एम. एस. नाईक हायस्कूलमध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळाचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न


रत्नागिरी, : एम. एस. नाईक हायस्कूलमध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळाचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशफाक नाईक, सीईओ श्री. अकिब काझी, पर्यवेक्षक श्री. मनोज चवेकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. अशफाक नाईक होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी तालुक्याचे डी.वाय.एस.पी. श्री. मुख्तार शेख उपस्थित होते.
स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेच्या शिक्षिका सौ. नाझनीन मानकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. यावेळी मुख्य विद्यार्थी प्रतिनिधी रशिद मिरकर, मुख्य विद्यार्थिनी प्रतिनिधी सुवैबा बक्षी, सहाय्यक विद्यार्थी प्रतिनिधी सालिक भाटकर, सहाय्यक विद्यार्थिनी प्रतिनिधी फातिमा झारी, रेड हाऊस कॅप्टन इक्रा काझी व व्हाइस कॅप्टन मुझक्किर माजगावकर, ग्रीन हाऊस कॅप्टन अदिना सोलकर व व्हाइस कॅप्टन आयान गडकरी, यलो हाऊस कॅप्टन ऐझा मिरकर व व्हाइस कॅप्टन उझेर साखरकर, ब्लू हाऊस कॅप्टन झोया पावसकर व व्हाइस कॅप्टन लिबा मुकादम, स्पोर्ट्स मास्टर मूफिज होडेकर व सोनाक्षी यादव तसेच सहाय्यक स्पोर्ट्स मास्टर फातिमा मिरकर व आयान मोगल यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी शाळेची शिस्त, स्वच्छता, गुणवत्ता व सर्वांगीण प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची शपथ घेतली.
प्रमुख पाहुणे श्री. मुख्तार शेख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नवनिर्वाचित विद्यार्थी मंत्रिमंडळाचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना नेतृत्व, शिस्त व जबाबदारीची जाणीव ठेवून कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच आजच्या डिजिटल युगात मोबाईलचा अतिवापर टाळून त्याचा शिक्षण, ज्ञानवृद्धी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी विधायक उपयोग करण्याचा मौल्यवान सल्ला दिला.
मुख्याध्यापक श्री. अशफाक नाईक यांनी विद्यार्थ्यांनी नेतृत्वगुण, संघभावना आणि सामाजिक जबाबदारी जोपासून शाळेच्या प्रगतीत सक्रिय योगदान द्यावे, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ. शबाना मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री. मनोज चवेकर यांनी केले. हा समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Breaking News

झाडे लावण्यापेक्षा लावलेली झाडे जगविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी – आमदार किरण सामंत

🔴झाडे लावण्यापेक्षा लावलेली झाडे जगविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी...

सिकंदराबाद येथे माजी सैनिक आणि सेवारत सैनिकांच्या पाल्यांसाठी ‘अग्निवीर’ भरती मेळावा

सिकंदराबाद येथे माजी सैनिक आणि सेवारत सैनिकांच्या पाल्यांसाठी 'अग्निवीर'...