सहयाद्रि शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी- चिंचघरी (सती) ता.चिपळूण या प्राथमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ तसेच शिवरायांच्या वेशभूषेत आलेला विद्यार्थी कु.रेहांश नरेश चाळके व जिजाबाईच्या वेशभूषेतील कु.अनया संतोष लांबे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी विद्यार्थी
कु.शौर्य पोटे, कु.निधी चव्हाण,कु.स्वराज कडव, कु.स्वराज पाटील,कु.अद्विक मुकनाक, कु.शुभ्रा मोडक,कु.समिक्षा पोटे,
कु.आरोही जाधव,कु.रेहांश चाळके,कु.मैथिली राणे, कु.मनस्वी कदम,कु.भार्गवी कदम,कु.अनया लांबे या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अधिक माहिती आपल्या भाषणातून दिली. तर शिक्षिका सौ.विनया नटे ओघवत्या भाषा शैलीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्या मनोगतातून व गीतातून उलगडून दाखविला. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ यांनी शिवरायांविषयी अधिक माहिती दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षिका सौ.रश्मी राजेशिर्के यांनी अतिशय खुमासदार शैलीत केले. कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ, शिक्षिका सौ. मनिषा कांबळी, सौ. रश्मी राजेशिर्के, श्री. संदेश सावंत, सौ. अपूर्वा शिंदे, सौ. विनया नटे, श्रीम. वृषाली राणे, श्रीम. अर्चना देशमुख, सौ. रूपाली खरात, श्रीम. ज्योती चाळके, श्रीम. वर्षा सकपाळ, सौ. शितल पाटील, सौ. स्वरा भुरण, शिक्षकेतर कर्मचारी श्री.विनोद उदेग,श्री.एकनाथ चाळके, सौ. प्रतिभा तांबिटकर यांनी विशेष मेहनत घेतली.
