रत्नागिरीकोकणातील कर्तृत्वान नेत्यांचा नाणीज च्या सुंदरगडावर नागरी सत्कार होणार

कोकणातील कर्तृत्वान नेत्यांचा नाणीज च्या सुंदरगडावर नागरी सत्कार होणार

कोकणातील कर्तृत्वान नेत्यांचा नाणीज च्या सुंदरगडावर नागरी सत्कार होणार


नाणीज, दि. १९ – जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे उद्या गुरुवारी कोकणातील कर्तृत्ववान नेत्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. त्यांनी प्रदीर्घकाळ राजकारणात राहून या भागाची सेवा केली आहे. त्यांचे प्रश्न मांडले आहेत. कोकणला नावलौकिक मिळवून दिला आहे. हा सत्कार जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे.
येथील सुंदरगडावर संतशिरोमणी श्री गजानन महाराज यांचा प्रकटदिन सोहळा सुरू आहे. त्यानिमित्त भाविकांच्या प्रचंड गर्दीत विविध कार्यक्रम होत आहेत. त्यामध्ये उद्या दुपारी चार वाजता हा सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे, राज्याचे उद्योगमंत्री, उदय सामंत, बंदरे विकास मंत्री निलेश राणे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार दीपक केसरकर, आमदार भास्कर जाधव, आमदार नितेश राणे, आमदार शेखर निकम, आमदार किरण (भैय्या) सामंत यांचा समावेश आहे. हा कोकणच्या सुपुत्रांचा सत्कार जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी दैनिक रत्नागिरी टाईम्सचे मालक उल्हासराव घोसाळकर व प.पू. कानिफनाथ महाराज उपस्थित असणार आहेत.

Breaking News