संगमेश्वरकरजुवे ते संगमेश्वर निघालेल्या एसटीच्या  वाहकाचा चालत्या गाडीत ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

करजुवे ते संगमेश्वर निघालेल्या एसटीच्या  वाहकाचा चालत्या गाडीत ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

संगमेश्वर तालुक्यातील घारेवाडी गावच्या हद्दीत हृदय पिलवटून टाकणारी घटना घडली.तुकाराम कुंडलिक माने  (वय – 42), असे  वाहकाचे नाव आहे
संगमेश्वर /एजाज पटेल 

करजुवे येथून देवरुख डेपोची सकाळी 6.15 च्या दरम्यान सुटणारी वस्तीची एसटी  वाहकाचा चालत्या गाडीत ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.संगमेश्वर तालुक्यात येणाऱ्या घारेवाडी  गावच्या हद्दीत ही घटना घडली. तुकाराम कुंडलिक माने वय वर्षे 42 असे वाहकाचे नाव आहे.त्याचे मूळ गाव जोडवाडी  बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील आहे .पुंडलिक कुटुंबावर मोठे आघात कोसळले आहे. तर वाहकाच्या मृत्यूच्या घटनेने एसटी वाहक, चालकांमधून सुद्धा  हळहळ व्यक्त केली जात आहे.
मंगळवारी 18 फेब्रुवारी रोजी चालक बालाजी मनोहर कोपनर आणि वाहक तुकाराम कुंडलिक माने यांनी MH08BT/2682 या त्यांच्या ताब्यात देण्यात आलेल्या एसटी बसने  11.30 ते संध्याकाळी  5.30 पर्यंत  संगमेश्वर ते करजुवे अशा प्रवाशा  फेऱ्या करून  पुन्हा सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर येथून करजुवे वस्ती बस घेऊन गेले होते. बुधवारी सकाळी 6.15 वाजता करजुवे (भोळे दुकान )येथून  प्रवाशी घेऊन एसटी संगमेश्वर येथे येत असताना  भायजेवाडी मार्गे घारेवाडी येथे एसटी आली असता  वाहक तुकाराम माने याला चक्कर येऊन तो खाली पडल्याचे मोहन रघुनाथ गौतडे यांनी एसटी चालकाला सांगितले.चालकाने एसटी रस्त्याच्या बाजूला उभी करून वाहक तुकाराम मानेकडे विचारपूस केली असता त्याने अस्वस्थ वाटत असल्याचे  आणि छातीत दुखत असल्याचे सांगितले.
चालक बालाजी कोपनर यांनी वेळ न घालवता व प्रवाशांची मदत घेत  थेट संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाकडे एसटी आणून तेथे वाहकाला उपचारासाठी दाखल केले मात्र  दाखल करण्यापूर्वीच तुकाराम याचा  मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी घोषित केले.

 दुर्दैवी आणि हृदय पीळवटून टाकणारे वृत्त समजताच देवरुख आगार व्यवस्थापक रेश्मा मधाळे,स्थानक प्रमुख कैलास साबळे तसेच वाहक आणि चालकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली.मनमिळाऊ शांत स्वभावाचा सहकारी अचानक सोडून गेल्याने काही वाहक आणि चालकांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहताना दिसत होते.
घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपाधीक्षक शिवप्रसाद पारवे, पोलीस उपनिरीक्षक राजेश शेलार, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बरगळे, पोलीस कॉन्स्टेबल बाबुराव कोंदल यांनी दाखल होतं कार्यवाई करून  त्यांच्या कडून आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.       बीड जिल्ह्यातील आंबेजीगाई तालुक्यातील जोडवाडी गावातील 42 वर्षीय तुकाराम माने हा 2018 साली वाहक कम चालक म्हणुन देवरुख डेपोत रुजू झाला होता. दोन मुलगे आणि पत्नीसह देवरुख येथे त्याचे वास्तव्य होते.तर इतर कुटुंबीय बीड जिल्ह्यात असलेलेल्या मूळ गावी राहतात त्यांना घटनेची माहिती कळवण्यात आले असून ते संगमेश्वर येथे दाखल झाले आहेत

Breaking News