रत्नागिरीपारस बालभवनातील चिमुकल्यांसोबत जी.के.एस. महाविद्यालयाचे रक्षाबंधन उत्साहात संपन्न

पारस बालभवनातील चिमुकल्यांसोबत जी.के.एस. महाविद्यालयाचे रक्षाबंधन उत्साहात संपन्न

पारस बालभवनातील चिमुकल्यांसोबत जी.के.एस. महाविद्यालयाचे रक्षाबंधन उत्साहात संपन्न

खडवली(शांताराम गुडेकर )
मस्कळ येथील अनाथ व निराधार मुलांचे संगोपन करणाऱ्या पारस बालभवन येथे जी.के.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला

विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, प्रेम, आपुलकी व बंधुभावाची भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. सागर यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागप्रमुख प्रा. दिनेश घरत यांनी या उपक्रमाचे नियोजन व आयोजन केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. जी. सागर यांनी पारस बालभवनच्या संचालिका सौ. गुंजाळ मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. त्यानंतर महाविद्यालयातील अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनींनी पारस बालभवनातील चिमुकल्यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण आनंदाने साजरा केला. या उपक्रमामुळे विद्यार्थिनी व बालभवनातील मुलांमध्ये प्रेम, स्नेह आणि आपुलकीचे नाते अधिक दृढ झाले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत तांदळे तसेच प्रा. रसिका लोकरे, प्रा.श्वेता जाधव, प्रा. कृतिका खंडागळे, प्रा. निचिता हिंदुराव, प्रा. शफीक शेख, प्रा. सुमित गवारे* यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी पारस बालभवनच्या संचालिका सौ. गुंजाळ मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. सामाजिक बांधिलकी जपत रक्षाबंधनाचा सण साजरा केल्याने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता व माणुसकीची भावना अधिक दृढ झाली. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

Breaking News

Πληρωμές & Δεσμεύσεις στο Spinsy casino

Οι κυβερνο βηματα στη διαδικτυακή ντόπια επιχείρηση έχουν εξελιχθεί,...

Luna Casino: Indbetalinger og Metoder

Indbetaling er fundamentet for en god spilleoplevelse hos Luna...