रत्नागिरीप्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी सती येथे गुरुजनांचा गौरव - शिक्षक दिन उत्साहात...

प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी सती येथे गुरुजनांचा गौरव – शिक्षक दिन उत्साहात संपन्न

प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी सती येथे गुरुजनांचा गौरव – शिक्षक दिन उत्साहात संपन्न

प्राथमिक शाळा खेर्डी चिंचघरी (सती) येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर शाळेतील सर्व शिक्षकवृंदांचा भेटवस्तू व पुष्प देवून शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरविंद सकपाळ सर यांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव करण्यात आला.यावेळी विनया नटे यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगताना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक कार्याची व त्यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व त्यांनी आपल्या मनोगतातून विशद केले.तसेच कु . अनया लांबे हिने शिक्षक दिनाचे महत्त्व प्रभावी शब्दांत सांगून गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शाळेतील सर्व विद्यार्थी व शालेय मंत्रिमंडळातील सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना शुभेच्छा देऊन त्यांच्याप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली. सर्व शिक्षक, विद्यार्थी व शालेय मंत्रिमंडळाच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिक्षक दिनाचा हा सोहळा अत्यंत आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका मनीषा कांबळे यांनी केले .

Breaking News

उत्कर्ष महिलामंडळात ‘जागर नारी शक्ती’ अंतर्गत महिलांच्या मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन

उत्कर्ष महिलामंडळात ‘जागर नारी शक्ती’ अंतर्गत महिलांच्या मानसिक आरोग्याबाबत...

प्राथमिक आरोग्य केंद्र चांदेराई येथे जन आरोग्य समितीची सभा संपन्न

प्राथमिक आरोग्य केंद्र चांदेराई येथे जन आरोग्य समितीची सभा...