आकाशवाणी रत्नागिरीच्या ‘कोकण दर्शन’मध्ये ‘उत्सवी पर्यटन – गणपती विशेष भाग १’
रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील उत्सवी वातावरण, परंपरा आणि पर्यटनाचा अनुभव श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ‘कोकण दर्शन’ कार्यक्रमात ‘उत्सवी पर्यटन – गणपती विशेष भाग १’ हा विशेष कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे.
कोकणातील गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये, या काळात येणारे चाकरमानी, गणपतीच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतचे उत्सवी वातावरण, पारंपरिक प्रथा-परंपरा आणि या काळातील पर्यटनाच्या विविध संधी यातून उलगडणार आहेत .
या विशेष कार्यक्रमात अभिजीत नांदगावकर, कौस्तुभ पालकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश वराडकर आणि अक्षय पिलणकर सहभागी झाले आहेत. लेखन सोनाली सावंत यांचे असून निवेदन आणि निर्मिती सहाय्य वंदना मुसळे व सोनाली सावंत यांनी केले आहे. सादरकर्ते विवेक वानखडे आहेत.
हा कार्यक्रम शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८.४० वाजता आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होईल.
हा कार्यक्रम ११४३ किलोहर्ट्झ मध्यमलहरी, १०१.५ एफ.एम., NewsOnAir मोबाईल अॅप, तसेच YouTube – airratnagiri1248 आणि Facebook व Instagram – @airratnagiri वर ऐकता येणार आहे.
कोकणातील गणेशोत्सवाचा सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या वेध घेणारा ‘उत्सवी पर्यटन – गणपती विशेष भाग १’ हा कार्यक्रम श्रोत्यांनी आवर्जून ऐकावा, असे आवाहन आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
