रत्नागिरीस्वर घागची तायक्वांदोमध्ये सुवर्ण कामगिरी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

स्वर घागची तायक्वांदोमध्ये सुवर्ण कामगिरी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

स्वर घागची तायक्वांदोमध्ये सुवर्ण कामगिरी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूल, सावर्डे येथील विद्यार्थी स्वर संदीप घाग याने चिपळूण बांधल हायस्कूल येथे सोमवारी झालेल्या तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत ३८ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची राजापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्वरने यापूर्वी २०२५ मध्ये तायक्वांदो असोसिएशनच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत ओपन चॅलेंज फाईटमध्ये कांस्यपदक, फ्रीस्टाईल पुमसेमध्ये कांस्यपदक तसेच शालेय तायक्वांदो स्पर्धेत कांस्यपदक, अशी तीन पदके मिळवली आहेत. उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळवून आपल्या यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
स्वरने सावर्डे येथील अमेय क्लासेसमध्ये भरत करार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर २०२४ पासून कराटेचे प्रशिक्षण सुरू केले. लहान वयातच त्याने नियमित सराव, कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
स्वरच्या या यशामुळे कुटुंबीय, शिक्षक, प्रशिक्षक आणि मित्रपरिवारातून त्याचे अभिनंदन होत आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतही स्वरने उत्कृष्ट कामगिरी करून यश मिळवावे आणि आपल्या गावाचे व शाळेचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी शुभेच्छा सर्व थरातून मिळत असून सहयाद्री शिक्षण संस्थेचे कार्याअध्यक्ष आमदार मा शेखर निकम, सचिव महेश महाडिक शाळेच्या मुख्याद्यापक मीरा जोशी, अमये क्लासेस चे नदीवडेकर यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत

Breaking News

शालेय तायक्वांदो तालुका स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलची दमदार कामगिरी

शालेय तायक्वांदो तालुका स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम...

एसएम जोशी फिजीओथेरपी महाविद्यालयाचे स्ट्रोक हृदयविकार जागरुकता शिबीर

एसएम जोशी फिजीओथेरपी महाविद्यालयाचे स्ट्रोक हृदयविकार जागरुकता शिबीर 👉आजच्या व्यस्त...