गणेशोत्सव शांततेत साजरा करावा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
👉रत्नागिरी- (वार्ताहर).
सोमवार दिनांक १४ सप्टेंबर पासून सुरू होणारा आणि कोकणातील सर्वाधिक लोकप्रिय सण म्हणून ओळखला जाणारा गणेश उत्सव शांततेत आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे. रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते..
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानाडे.पोलिस अधीक्षक नितीन बगाटे (ऑनलाइन) डि.वाय.एस.पी अरांक्षा यादव.निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी. रत्नागिरी नगर परिषदेचे मुखाधिकारी वैभव गारवे. ज्येष्ठ पत्रकार अलिमियां काझी. मुन्ना सुर्वे. डॉ अलिमियां परकार.जयसिंग घोसाळे.बशीर मुर्तुझा मुन्ना चवंडे एडवोकेट प्रसाद जड्यार यांच्या सह इतर प्रमुख अधिकारी व हिंदु मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळी उपस्थित होती.. सर्वांनीच नेहमी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचा सण शांततेत आणि उत्साही वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले..
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी उपस्थितांचे स्वागत करून मागील उत्सवाची पार्श्वभूमी सांगितली आणि रत्नागिरी जिल्ह्यात सर्व सण नेहमीच शांततेत साजरे केले जातात याबद्दल अभिमान वाटतो असे म्हणाले.. जिल्हाधिकारी मनुज जिंदल पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानाडे यांनी गणेशोत्सवा साठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले आणि यंदा ही नेहमीप्रमाणे गणेशोत्सव शांततेत आणि उत्साही वातावरणात साजरा करावा असे आवाहन केले
