रत्नागिरीकोकण बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजेच एजीएम चेअरमन आसिफ दादन यांच्या प्रमुख...

कोकण बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजेच एजीएम चेअरमन आसिफ दादन यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळी मेळीच्या आणि उत्साही वातावरणात शांततेत पडली पार

कोकण बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजेच एजीएम चेअरमन आसिफ दादन यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळी मेळीच्या आणि उत्साही वातावरणात शांततेत पडली पार-
👉 कोकण बँकेचा पाया मजबूत करण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत विकासावर भर देत कोकण मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये दमदार कामगिरी केली आहे. शाखांचा विस्तार, स्वमालकीच्या जागांमध्ये वाढ, एनपीए नियंत्रण, ठेवींमध्ये वाढ आणि कर्मचारी हिताचे निर्णय यामुळे बँकेची आर्थिक स्थिती अधिक भक्कम झाली आहे. अशाचवेळी बँकेचे लवकरात लवकर शेड्युल बँकेत रुपांतर करण्याचे आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन बँकेचे चेअरमन आसिफ दादन यांनी केले आहे .
मुंबईतील के.सी. कॉलेज येथे बँकेची ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी बँकेच्या आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील कामगिरीचा आढावा घेण्यात आला. चेअरमन असिफ दादन यांनी बँकेची वाटचाल केवळ नफ्याच्या आकड्यांवर आधारित नसून ग्राहकांचा विश्वास, आर्थिक शिस्त आणि गुणवत्तापूर्ण विकास या त्रिसूत्रीवर असल्याचे स्पष्ट केले. बँकेच्या ठेवी ९१५ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत ठेवींमध्ये १०.०४ टक्क्यांची वाढ झाली आहे. कर्ज व आगाऊ रकमेतही १०.३५ टक्के वाढ झाली असून ती ५६१.२३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. बँकेचे एकूण उत्पन्न ८१.७३ कोटी रुपये तर निव्वळ नफा ७.१८ कोटी रुपये झाला आहे.
विशेष म्हणजे, बँकेच्या एकूण २५ शाखांपैकी २२ शाखा आता स्वतःच्या मालकीच्या जागेत कार्यरत आहेत. गोवा राज्यातील पणजी शाखा दीर्घकाळ भाडेतत्त्वावर वापरात असलेली जागा आता स्व-मालकीची झाली आहे. त्यामुळे बँकेच्या मालमत्तेत भर पडण्याबरोबरच भविष्यातील खर्चावरही नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. २५ पैकी २२ शाखा स्वमालकीच्या जागेत असणे ही बँकेच्या आर्थिक नियोजनाची महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे.
बँकेच्या आर्थिक शिस्तीचे महत्त्वाचे फलित म्हणून नेट एनपीए २.८४ टक्क्यांवर आला आहे. सातत्यपूर्ण वसुली, काटेकोर कर्जमूल्यांकन आणि कर्ज खात्यांची नियमित देखरेख यामुळे एनपीए नियंत्रणात आणण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. प्राधान्य क्षेत्रासाठी ३०७.७० कोटी, तर दुर्बल घटकांसाठी १७९.९८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले.

दरम्यान बँकेला ‘बेस्ट मल्टी स्टेट अर्बन को-ऑपरेटिव् बँक हा टियर-२ श्रेणीतील पुरस्कार मिळाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अकबर कोंडकरी यांना ‘बेस्ट सीईओ ऑफ द इयर’, तर तंत्रज्ञान अधिकारी तबरेज बलबले यांना ‘सीटीओ ऑफ इयर २०२६ पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा , रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण ,ठाणे जिल्ह्यातील कौसा, तर मुंबई उपनगर मधील गोवंडी बँकेला बेस्ट ब्रांच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या सभेला उपाध्यक्ष असगर डबीर,संचालक अल्ताफ काझी,नजीब मुल्ला, बशीर मुर्तुझा, नावेद रोगे, दिलीप मजावर तसनीम काझी, फरीदा काझी, समीर मुल्ला, मकबूल सुर्वे,शहीद बारमारे ,मिलिंद कडलक,साजिद अधिकारी,अब्दुल रशीद शेख,फरहान वलेले या संचालकांसह मूख्य कार्यकारी अधिकारी अकबर कोंडकरी, व भागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार मुश्ताक अंतुले.माजी संस्थापक अली एम शम्शी यांच्यासहित मुंबईतील अनेक उद्योजक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, डॉक्टर, वकील यांच्यासह बँकेचे सभासद अधिकारी -कर्मचारी आणि कर्मचारी युनियनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News