📰 सखी सावित्री समितीची बैठक उत्साहात संपन्न
रत्नागिरी वार्ताहर : नाईक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल, रत्नागिरी येथे सखी सावित्री समिती २०२६-२७ ची बैठक दिनांक ०९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री नोमान नाईक,मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अकीब काझी,
प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. आरिफा म्हालदार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले.
बैठकीमध्ये विद्यार्थिनींचे शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, सुरक्षितता, बालहक्क, वैयक्तिक स्वच्छता, भावनिक आरोग्य आणि सर्वांगीण विकास यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. विद्यार्थिनींनी आपल्या अडचणी न घाबरता मांडाव्यात तसेच शाळेत सुरक्षित व आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
समितीच्या सदस्य व शाळेच्या महिला शिक्षक प्रतिनिधी श्रीमती दिलनवाज कोतवडेकर,
श्री. पांडुरंग नंदिवले (समुपदेशक),
श्रीमती सायली पाटील (नगरपरिषद महिला प्रतिनिधी),
सौ. अस्मिना सोलकर – (पालक महिला प्रतिनिधी) आणि
सौ. आरिफा म्हालदार – मुख्याध्यापिका यांनी बैठकीत सक्रिय सहभाग घेतला.
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून Falaq F. Hajju (5A), Mariya M. Sakharkar (5B), Mueez Hodekar (5B) आणि Khubaib Mukadam (5C) यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी संस्थाध्यक्ष श्री. नोमान नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अकीब काझी आणिमाध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. अशफाक नाईक यांनी सखी सावित्री समितीच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसह त्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीसाठी समितीने सातत्याने कार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
पालक, शिक्षक, समिती सदस्य आणि विद्यार्थी यांच्यातील समन्वयातून विद्यार्थिनींसाठी सुरक्षित, सकारात्मक आणि पोषक वातावरण निर्माण करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
