RBI च्या आकडेवारीनुसार, मागील ३ वर्षांपासून परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल क्रमांकावर आहे. विरोधकांनी उद्योग क्षेत्रावर टीका करण्याआधी ग्राऊंड रिअलिटी तपासावी अस वक्तव्य मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी केलं.
मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे आहेत हे विधान चुकीचे आहे. फक्त २७ किमीवर मर्यादित समस्या असून पुढच्या गणपतीपर्यंत ती दूर केली जाईल, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.
औद्योगिक गुंतवणुकीचे नवे पर्व सुरू!
रत्नागिरीत २० हजार कोटींचा सेमिकंडक्टरचा प्रकल्प येत आहे. कोका कोलाची कंपनी ३ वर्षापूर्वी आणली. रेल्वे कारखान्यांचं उद्घाटन होणार आहे. धिरुभाऊ अंबांनी डिफेन्स सिटी रत्नागिरीत उभारली जात आहे. RRP समूह कोकणात साडेतीन हजारांची गुंतवणूक करत आहेत.
मराठी शिकवण्यासाठी मारण्यापेक्षा आम्ही अॅप तयार करणार आहोत. शिकायला नकार दिला तर त्यावर कायदेशीर बाबी असल्याच मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितलं.