रत्नागिरीSBI फाऊंडेशन आणि SBI म्युच्युअल फंड यांच्या CSR फंडातून पाली ग्रामीण रुग्णालयाचे...

SBI फाऊंडेशन आणि SBI म्युच्युअल फंड यांच्या CSR फंडातून पाली ग्रामीण रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले.

SBI फाऊंडेशन आणि SBI म्युच्युअल फंड यांच्या CSR फंडातून पाली ग्रामीण रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले. या नूतनीकृत रुग्णालयाचे लोकार्पण आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

सरकारी प्रयत्नांना जेव्हा SBI सारख्या संस्थांच्या CSR निधीची जोड मिळते, तेव्हा सामान्यांपर्यंत उत्तम सुविधा पोहोचणे सहजसाध्य होते. या माध्यमातून पाली आणि आसपासच्या ग्रामीण भागातील जनतेला आता तात्काळ आणि दर्जेदार उपचार मिळण्यास मदत होईल. आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी शासन कटिबद्ध असून अशा सामाजिक सहभागाला नेहमीच प्रोत्साहन दिले जाईल. अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त या रुग्णालयातून रुग्णसेवा उत्तम व दर्जेदार होईल, असा विश्वास यावेळी उपस्थितांशी बोलताना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केला.

या लोकार्पण सोहळ्याला रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक आमदार आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी.​स्थानिक पंचायतीचे सरपंच आणि सदस्य, जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल, ​जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, ​पाली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, कर्मचारी वृंद आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Breaking News