रत्नागिरीअमेय अशोक लिमये बोडस ट्रस्टच्या कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित

अमेय अशोक लिमये बोडस ट्रस्टच्या कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित

गेली सुमारे २७ वर्षे ऑफसेट प्रिंटिंग, बुक बाईंडिंग आणि सायकल ब्रँड अगरबत्तीचे डिस्ट्रीब्यूटर म्हणून कार्यरत असणारे साडवली देवरुख चे रहिवासी अमेय अशोक लिमये यांना रत्नागिरी येथील बोर्ड चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेमार्फत “कार्यगौरव” पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

ऑफसेट प्रिंटिंग, बुक बाईंडिंग आणि सायकल ब्रँड अगरबत्तीचे डिस्ट्रीब्यूटर म्हणून कार्यरत असतानाच, देवरुख – साडवली परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर स्वेच्छेने विद्युत यंत्रणेच्या दुरुस्ती करिता महावितरणचे कर्मचारी यांना मदत करीत आले आहेत. महावितरणच्या विद्युत पुरवठ्यामधील आलेला व्यत्यय दूर करून परिसरातील विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत व्हावा व सर्वांचे जीवन प्रकाशात उजळून निघावे याकरिता ते करीत असणारे प्रयत्न खरोखरच कौतुकास पात्र आहेत. त्यांच्या या कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून प्रयत्न करण्याच्या कृतीमुळेच परिसरात ते वीजदूत अमेय अशोक लिमये म्हणून देखील सर्वांना सुपरिचित आहेत. त्यांच्या या कार्याचा उचित गौरव व्हावा या हेतूने रत्नागिरीच्या बोर्डस चॅरिटेबल ट्रस्टने त्यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. रोख रुपये 3,000/-, सन्मानपत्र, शाल, पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप असून दिनांक 2 मार्च 2026 रोजी प्राध्यापक उदय बोडस यांच्या रत्नागिरी येथील निवासस्थानी श्री. लिमये यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

यासोबतच अमेय अशोक लिमये हे नोटा आणि नाणी संग्रहक असून त्यांच्या संग्रहामध्ये जवळपास 150 विविध देशांची नाणी व नोटा पहावयास मिळतात. अमेय गुगल मॅप लोकल गाईड थोडक्यात वाटाड्या म्हणूनही ते कार्यरत आहेत.

देवरुख परिसरातील श्री देव विठ्ठल मंदिर देवस्थान मंडळ, ब्राह्मण सेवा संघ देवरूख, सह्याद्री नगर मित्र मंडळ अशा विविध स्वरूपात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्थांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...