सह्याद्रि शिक्षण संस्थेचे वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा कुमार वेदांत कदम हा विद्यार्थी एन एम एम एस परीक्षेमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये प्रथम आला आहे. डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या या परीक्षेमध्ये वेदांतने जिल्ह्यात प्रथम येऊन सह्याद्रि शिक्षण संस्थेचा व असुर्डे विद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे.एनएमएमएस परीक्षा, जी ‘नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप’ परीक्षा म्हणून ओळखली जाते, ही एक राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षा आहे जी सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते,ज्यांचा उद्देश गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवणे आहे. गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे तसेच शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे हा या शिष्यवृत्ती परीक्षेचा उद्देश आहे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर भाट यांनी केलेल्या नियोजन व मार्गदर्शनानुसार बापूसाहेब जमादार,सुरभी मोहिरे, चंद्रकांत निंबाळकर, प्रीतम विचारे यांनी विविध विषयासाठी वेदांतला मार्गदर्शन केले. सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम सर, सेक्रेटरी महेशजी महाडिक, ज्येष्ठ संचालक शांताराम खानविलकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन डी ए पाटील, ज्येष्ठ सदस्य शंकर खापरे, रघुनाथ राऊत, यशवंत भागडे यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर भाट,सर्व मार्गदर्शक शिक्षक व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
