रत्नागिरीअसुर्डे विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उदघाट्न

असुर्डे विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उदघाट्न

सावर्डे:सह्याद्रि शिक्षण संस्थेचे, वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, असुर्डे- आंबतखोल या विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शालेय समितीचे जेष्ठ सदस्य .रघुनाथ राऊत, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक .डी डी फुटक, असुर्डे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष व कार्यकारी अधिकारी निलेश खापरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर भाट यांच्या मार्गदर्शनानुसार व क्रीडा शिक्षक व्ही पी कांबळे यांच्या नियोजनानुसार या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.या उद्घाटन प्रसंगी क्रीडा ज्योत प्रज्वलीत करण्यात आली व क्रीडा शपथ घेण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ, पालक, विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवामध्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यावेळी मुलगे व मुली यांच्या विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धा मध्ये कबड्डी,खो-खो,हॉलीबॉल, 4*100 रिले या सांघिक स्पर्धा तर थाळी फेक, गोळा फेक,भालाफेक,उंच उडी, 100 मी. धावणे, 200 मी.धावणे 400 मी. धावणे 800 मी. धावणे, 1500 मी धावणे या वैयक्तिक स्पर्धाचे आयोजन केले आहे.

Breaking News