रत्नागिरीअसुर्डे विद्यालयात शिवजयंती साजरी

असुर्डे विद्यालयात शिवजयंती साजरी

सह्याद्रि शिक्षण संस्थेचे वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असुर आंबट कॉल या विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर भाट यांच्या मार्गदर्शनानुसार शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व वंदन,त्यांचा जीवन परिचय करून देणारे भित्तीपत्रक, त्यांच्या जन्म,बालपण,कार्य याविषयी माहिती देणारी शिक्षक व विद्यार्थ्यांची भाषणे, छत्रपती छत्रपती शिवरायांची गौरव गीते इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले.

मुख्याध्यापक अमर भाट यांनी यावेळी बोलताना सांगितले की, छत्रपती शिवराय हे हिंदवी स्वराज्य संस्थापक, गोरक्षक, स्त्री रक्षक,स्त्री उद्धारक, प्रजादक्ष, सर्वधर्मसहिष्णुता मानणारे रयतेचे राजे होते.रयतेचे रक्षण करण्यास त्यांनी प्राधान्य दिले. कल्याणच्या सुभेदाराची सून तसेच रांझ्याचा पाटलाची उदाहरणे देऊन उपस्थितांना त्यांच्या सुयोग्य न्याय निवाड्याबाबत माहिती दिली. हिंदवी स्वराज्य स्थापन करताना त्यांनी सह्याद्रीच्या कुशीतील अनेक शूरवीर मावळे एकत्र केले व राजमाता जिजाऊ व शहाजीराजे यांचे स्वप्न पूर्ण केले.त्यांनी अफजलखानाचा वध केला,शाहिस्तेखानाची बोटे छाटली, आग्र्याहून सुटका करून घेतली, पन्हाळगडच्या वेढ्यातून सुखरूप सुटका करून घेतली. ते अत्यंत शूर,धाडसी,संयमी, निश्चयी,दूरदृष्टी असणारे राजे होते असे सांगितले.

चंद्रकांत निंबाळकर यांनी शिवरायांचे जीवन कार्य याविषयी माहिती सांगितली. छत्रपती शिवरायांनी ध्येय, दूरदृष्टी,निरंतर या गुणांच्या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले व महाराष्ट्रातील तमाम रयतेचे संरक्षण केले,रयतेचे राज्य स्थापन केले. जगात सर्वात महान राजे म्हणून छत्रपती शिवरायांना मानले जाते असेही यावेळी त्यांनी सांगितले. त्यांनी घालून दिलेले आदर्श तसेच त्यांचे कार्य यांचे वाचन करावे, त्यांनी घालून दिलेले आदर्श यांचा अंगीकार करावा असे सर्वांना आवाहन केले.

यावेळी छत्रपती शिवराय यांच्याविषयी माहिती कथन करणारी समिधा खापरे, दिक्षा तांबे, उत्कर्षा चोगले यांची भाषणे अत्यंत लक्षवेधक व प्रभावी ठरली.या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. उदयकुमार पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर बापूसाहेब जमादार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Breaking News