कुडाळ दि. ३१ :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कुडाळ-मालवण मतदार संघाची बैठक शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कमंत्री आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत शेकडो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या बैठकीत शिवसेनेची संघटनात्मक ताकद, आगामी निवडणुकीसाठीची रणनीती आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास यावर सखोल चर्चा झाली. आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह आणि भगव्या विजयाचा निर्धार पाहून खात्री वाटते की, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत शिवसेना भगवा फडकवणार आहे.
कार्यकर्त्यांनी आपल्या गावात, आपल्या विभागात राहून संघटना अधिक बळकट करावी, विकासाच्या योजनांबद्दल जनतेपर्यंत पोहोचावं, हीच वेळ भगव्या विजयाची आहे, हे आवाहन या निमित्तानं केलं.
महायुतीच्या भावनेनं, परंतु शिवसेनेचा झेंडा अभिमानानं फडकवण्याचा निर्धार सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला असल्याचे यावेळी ना. उदय सामंत यांनी म्हटले.
या बैठकीस माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
