रत्नागिरीआज दिनांक १७ मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती ( तिथी...

आज दिनांक १७ मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती ( तिथी प्रमाणे) चे औचित्य साधून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहर तर्फे रत्नदुर्ग किल्ला ते थिबा गार्डन महाराजांच्या पुतळा पर्यंत ज्योत नेण्यात आली व अभिषेक करण्यात आला

आज दिनांक १७ मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती ( तिथी प्रमाणे) चे औचित्य साधून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहर तर्फे रत्नदुर्ग किल्ला ते थिबा गार्डन महाराजांच्या पुतळा पर्यंत ज्योत नेण्यात आली व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आई जिजाऊ आणि छत्रपतींच्या मूर्तीला पुष्पहार घालण्यात आला. छत्रपतींच्या घोषणा देऊन आजची शिवजयंती अगदी उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी मनसे शहर संघटक अमोल श्रीनाथ, उपशहर अध्यक्ष राजेश नंदाने, उपशहर अध्यक्ष राहुल खेडेकर, विभाग अध्यक्ष अक्षय सुतार, विभाग अध्यक्ष आकाश फुटक,शाखा अध्यक्ष अप्पू भाई सुतार, स्थानिक नागरिक महेंद्र पवार, तसेच ईतर पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Breaking News