चिपळूणआज पासून चिपळुणात राज्यस्तरीय सिझन बॉल क्रिकेट स्पर्धा होणार सुरू….

आज पासून चिपळुणात राज्यस्तरीय सिझन बॉल क्रिकेट स्पर्धा होणार सुरू….


◼️रणजीपटू भावीण ठक्कर यांची प्रमुख उपस्थिती
◼️पहिल्यांदाच टर्फ विकेटवर होणार स्पर्धा
◼️आमदार चषक स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष

🟥चिपळूण : चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्यावतीने राज्यस्तरीय सिझन बॉल आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 15 ते 22 फेब्रुवारीदरम्यान या स्पर्धा शहरातील पवन तलाव मैदानावर रंगणार असून स्पर्धेमध्ये 12 निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत. उद्या शनिवारी दि.. 15/02/2024..रोजी सकाळी 8/30.. वाजता या स्पर्धेचे थाटात उद्घाटन होईल, अशी माहिती क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी दिली.

◼️या स्पर्धेचे पूर्ण सज्जता झाली आहे. राज्यभरातील संघ दाखल झाले आहेत. रणजीपटू भावीण ठक्कर यांनी शुक्रवारी सकाळी मैदानाची पाहणी केली. नव्याने तयार झालेली खेळपट्टी उत्तम असल्याचा अभिप्राय त्यांनी दिला. सकाळी उद्घाटन प्रसंगी आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेशभाई कदम, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत यादव, उद्योजक प्रकाश देशमुख, शिवसेना नेते सचिन कदम, बाळा कदम, सुचय रेडीज, बाबू तांबे, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने, मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढाबकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबू ठसाळे, जिल्हा बँक संचालिका दिशा दाभोळकर, माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष मिलींद कापडी, माजी नगरसेवक आशिष खातू, शशिकांत मोदी, शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ, युवा नेते निहार कोवळे आदी उपस्थित राहणार आहेत.

◼️पवन तलाव मैदानावर आमदार. शेखर निकम यांच्या निधीतून नुकतीच टर्फ विकेट बनविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर सलग दुसऱ्या वर्षी या मैदानावर सिझन बॉल क्रिकेट रंगणार आहे. या मैदानावर अनेक सिझन बॉल क्रिकेट स्पर्धा रंगल्या. चिपळुणात कबड्डी, खो-खो, मल्लखांब, योगा, व्हॉलीबॉल, टेनिस, बुद्धिबळ अशा अनेक खेळांनी चिपळूणचे नाव मोठे केले. येथे राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धा झाल्या. एकनाथ सोलकर, जुल्फी परकार, गुलाम परकार, लतीफ परकार, रॉबिन, चंद्रकांत पंडित असे खेळाडू चिपळूणमधून पुढे गेले. मध्यंतरी माजी आमदार बापू खेडेकर यांच्या माध्यमातून येथे सिझन बॉल क्रिकेट होत होते. मात्र, अनेक वर्षे त्यात खंड पडला होता. आता टर्फ विकेट बनल्याने सिझन बॉल क्रिकेट स्पर्धा पहिल्यांदा यावर होणार आहे. पवन तलाव मैदानासाठी आ. निकम यांनी निधी मिळवून दिला. लवकरच या ठिकाणी पॅव्हेलियन, ड्रेसिंग रूम, स्वच्छतागृह उभारले जाणार आहे आणि हे पवन तलाव मैदान क्रीडाप्रेमींसाठी सज्ज होणार आहे. या ठिकाणी दरवर्षी राज्यस्तरीय क्रिकेट सिझन बॉल स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत अ गटातील सामने दि. 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान होतील. ब गटातील सामने दि. 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान होणार आहेत. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये व चषक, द्वितीय 1 लाख रु., तृतीय व चतुर्थ 50 हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने पवन तलाव मैदान सजले आहे. आकाशात झपावणारा बलून लक्षवेधी ठरत आहे. या स्पर्धेचे प्रक्षेपण लाईव्ह केले जाणार आहे. यशस्वी संघांना लाखोंची बक्षिसे देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, सामनावीर, मालिकावीर यांचाही गौरव होणार आहे, असे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी सांगितले.

◼️या वेळी भारतीय क्रिकेटमधील खेळाडू व रणजी खेळाडू स्पर्धेच्या निमित्ताने हजेरी लावणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुचयअण्णा रेडीज, मंगेश तांबे, अनिरुद्ध निकम, राजेश सुतार, सचिन कुलकर्णी, विनित देवधर, उदय काणेकर, सुयोग चव्हाण, लतीफ परकार, विक्रम भोसले, योगेश बांडागळे, सुनिल रेडीज, अजिंक्य पवार, गणेशकुमार लकडे, साहील कदम व सौरभ कुलकर्णी मेहनत घेत आहेत. उद्घाटन समारंभ, सात दिवस चालणारी स्पर्धा व समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनने केले आहे…..

Breaking News