आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी श्री संत जनार्दन स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (गुरुकुल), वेरूळ, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सव व विद्यार्थी संस्कार शिबिरास उपस्थित राहून विद्यादान आणि संस्कारांच्या या पवित्र प्रवासाचा अनुभव घेतला. यावेळी श्री संत जनार्दन स्वामी यांच्या पालखीचे पूजन मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कार रुजविणाऱ्या या गुरुकुल परंपरेला आणि उपक्रमाला भेट देऊन मनाला एक वेगळाच आनंद व ऊर्जा मिळाली, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.
या मंगल प्रसंगी पूजनीय श्री स्वामी शांतीगिरी महाराज, श्री सेवागिरी महाराज, तसेच उपमहापौर श्री. राजेंद्र जंजाळे, श्री. नाना गामणे, श्री. राजेंद्र पवार आणि श्री. गौरव गायकवाड यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
