रत्नागिरी, दि. 30 (जिमाका):- रत्नागिरी येथील सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सिंधुदूर्ग मालवणचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) सागर कुवेसकर यांच्याकडे देण्यात आला आहे. मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी याबाबत आज कार्यालयीन आदेश दिले आहेत.
सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय या पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी आनंद पालव यांच्याकडे देण्यात आलेला होता. तथापि प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सिंधुदूर्ग मालवणचे सहायक आयुक्त श्री. सागर कुवेसकर यांच्याकडे देण्यात आला आहे. स्वत:च्या पदाचे काम पाहून दिलेल्या अतिरिक्त कार्यभार पदाचे कामकाज पुढील आदेश होईपर्यंत पाहण्याबाबत कार्यालयीन आदेशात म्हटले आहे… झोपड्या उध्वस्त करून जेमतेम तीन दिवस झाले असतानाच आनंद पालव यांची उचलबांगडी करण्यात आली असल्याने मच्छिमारां मध्ये उलटसुलट चर्चा रंगली आहे–
