रत्नागिऱी : कॅमेरूनमधील डुआला येथे जाणाऱ्या ‘बिटु रिव्हर’ या बिटुमेन जहाजावर चढल्यानंतर पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यावरून समुद्री चाच्यांनी तामिळनाडू आणि केरळमधील प्रत्येकी दोघांसह सात भारतीयांचे अपहरण केले आहे. पनामा ध्वजांकित बिटुमेन टँकर रुबिस अॅस्फाल्टद्वारे चालवला जात होता. जो रिफायनरीमध्ये बिटुमेन मिळवतो आणि पश्चिम आणि मध्य आफ्रिकेत त्याचे वितरण करतो.
एमव्ही बीटू हे डांबर वाहतूक करणारे जहाज वेस्ट आफ्रिकेच्या हद्दीत गेल्यानंतर समुद्रीचाचेंच्या (पायरेट्स) ताब्यात सापडले. या जहाजावर एकूण १८ क्रू मेंबर असून यातील १० जणांना हे हल्लेखोर आपल्या सोबत घेऊन गेले आहे. या दहा जणांमध्ये सात भारतीय तर तीन रोमेनियन नागरिक आहेत. यामध्ये समीन जावेद मिरकर (रा. भाटकरवाडा, पेठकिल्ला, रत्नागिरी) आणि रेहान शब्बीर सोलकर (रा. कर्ला) या दोन रत्नागिरीतील तरुणांचा समावेश आहे.या घटनेने एकच खळबळ माजली असुन केंद्र सरकारच्या परराष्ट्र विभागने यांची गंभीर दखल घेतली असल्याचे समजते
आफ्रिकाच्या समुद्रात बिटु रिव्हर’ या जहाजचे अपहरण-सात भारतीयांचे अपहरण,त्यापैकी दोन रत्नागिरी तील….!
