रत्नागिरीआमदार किरण उर्फ भय्याशेठ सामंत सन्मान, जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित,...

आमदार किरण उर्फ भय्याशेठ सामंत सन्मान, जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित, जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण विजेता–

आमदार किरण उर्फ भैय्या शेठ सामंत सन्मान, जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित, जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण विजेता ठरला. या स्पर्धेचे रत्नागिरी जिल्हातून सर्व गटातून सुमारे १२० स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीचा अभिषेक चव्हाण याने आंतरराष्ट्रीय खेळाडू रियाज अकबर अली विरुद्ध खेळताना पहिला सेट ०१-२५ असा हरुनही पुढील दुसरा सेट आपल्या आक्रमक खेळाने २५-०७ असा जिकला. तिसऱ्या सेट अतिशय चुरशीचा झाला सात बोर्ड स्कोर २३-२० असा होता परंतु रियाज याने क्वीन चुकल्यामुळे अभिषेक याला गेम सेट करायला संधी मिळाली व त्याने एक सुंदर फिनिश करून ०१-२५, २५-०७ व २५-२० असे सेट जिंकून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात देवरूखच्या राहुल भस्मे व चिपळूणच्या मुक्तानंद वरवडेकर यानी देवरूखच्या योगेश कोंडविलकर व संजय कोंडविलकर जोडीचा १०-१२,१२-१० व १२-१० असा तीन सेट मध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. महिला गटाचे विजेतेपद रत्नागिरीच्या स्वरा मोहिरे हिने राजापूरच्या निधी सप्रे हिचा १७-०७ व १७ -०५ असा पराभव करून मिळवले. कुमार गटात रत्नागिरीच्या ओम पारकर याने जैतापुरचा हर्शल पाटील याचा तर किशोर गटात जैतापुरचा वेदांत करगुटकर याने जैतापुरच्याच राकीब तडवी याचा पराभव करून मिळवले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला लांजा राजापूरचे लोकप्रिय आमदार किरण उर्फ भय्याशेठ सामंत, श्री गिरीश सखाराम कानगूटकर (अध्यक्ष, जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ), प्रदीप भाटकर ( अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ) श्री मिलिंद साप्ते (सचिव, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), स्पर्धेतील प्रमुख पंच श्री प्रकाश कानिटकर सहाय्यक पंच सागर कुलकर्णी, स्पर्धा प्रमुख एकनाथ पाटील तसेच जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, जिल्हातील कॅरम खेळाडू व कॅरम प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे.

v पुरुष एकेरी

अंतिम सामना – अभिषेक चव्हाण विजयी विरूद्ध रियाज अकबरअली ( ०१-२५,२५-०७, २५-२०)

उपांत्य फेरी १- रियाज अकबरअली विजयी विरूद्ध अनिल गांधी (२५-१०,२५-०५)

उपांत्य फेरी २ – अभिषेक चव्हाण विजयी विरूद्ध राहुल भस्मे (२५-१२, २५-०७)

v पुरुष दुहेरी

अंतिम सामना – राहुल भस्मे / मुक्तानंद वरवडेकर विजयी विरूद्ध

संजय कोंडविलकर / योगेश कोंडविलकर (१०-१२, १२-१०, १२-१० )

उपांत्य फेरी १ – राहुल भस्मे / मुक्तानंद वरवडेकर विजयी विरूद्ध

विजय कोंडविलकर / दामोदर घाणेकर ( १०-०८,११-०९)

उपांत्य फेरी २ – संजय कोंडविलकर / योगेश कोंडविलकर विजयी विरूद्ध रियाज अकबरअली / अभिषेक चव्हाण ( १२-१५, १५-१०, १०-०८ )

v महिला गट एकेरी

अंतिम सामना – स्वरा मोहिरे विजयी विरूद्ध निधी सप्रे ( १७-०७,१७-०५ )

उपांत्य फेरी १- स्वरा मोहिरे विजयी विरूद्ध स्वप्नाली खरात (२३-००,२३-००)

उपांत्य फेरी २ – निधी सप्रे विजयी विरूद्ध सोम्या गुरव (२५-००,२५-००)

v कुमार गट एकेरी

अंतिम सामना – ओम पारकर विजयी विरूद्ध हर्षल पाटील ( १९-०१, १५-०१)

उपांत्य फेरी १- ओम पारकर विजयी विरूद्ध सर्वेश अमरे (२५-०८, २५-०५)

उपांत्य फेरी २ – हर्षल पाटील विजयी विरूद्ध आर्यन राऊत (१२-०६,०८-०६)

v किशोर गट एकेरी

अंतिम सामना – वेदान्त करगुटकर विजयी विरूद्ध राकीब तडवी (१६-१५, २५-१८ )

उपांत्य फेरी १- वेदान्त करगुटकर विजयी विरूद्ध शर्वेल पावसकर (१०-०१,०९-०७ )

उपांत्य फेरी २ – राकीब तडवी विजयी विरूद्ध कपिश देसाई (१९-०८,१०-०६)

आमदार श्री. किरणशेठ उर्फ भैया सामंत यांच्याकडून जुनियर कॅरम गटात राष्ट्रीय व राज्यस्तरावर विशेष कामगिरी करणाऱ्या १) निधी मनोज सप्रे २) स्वरा सुरेश मोहीरे ३) आर्यन राऊत ४) सर्वेश अमरे या चार कॅरम चा पूर्ण सेट मोफत भेट देऊन सन्मान तर केलाच आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.*
स्पर्धा अतिशय चांगल्या वातावरणात पार पडली. स्पर्धेसाठी जलाल काझी यांनी मोफत हॉल उपलब्ध करून दिला. स्पर्ध्या यशस्वी होण्यासाठी श्री गिरीश सखाराम कानगूटकर (अध्यक्ष ), श्रीकृष्ण राऊत (उपाध्यक्ष), सुनील करगुटकर ( खजिनदार ), प्रसाद मांजरेकर (सह सचिव ) सर्व जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, स्पर्धा प्रमुख एकनाथ पाटील तसेच जैतापुरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, कार्यकर्ते यांनी खुप मेहनत घेतली.

Breaking News