चिपळूणआमदार शेखर निकम यांचे प्रमुख उपस्थित दादर येथील सुमारे 75 लाखांच्या विकासकामांचे...

आमदार शेखर निकम यांचे प्रमुख उपस्थित दादर येथील सुमारे 75 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न


महिला प्रभाव संघ नवीन इमारतीची भूमिपूजन उत्साहात संपन्न

चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखरजी निकम यांचे प्रमुख उपस्थितीत दादर येथील विहीर बांधणे 15 लाख, दादर येथे गणपती विसर्जन घाट बांधणे 10 लाख,दादर अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे 25 लाख, दादर येथे महिला प्रभाग संघासाठी इमारत भूमिपूजन 25 लाख अशा कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.
याप्रसंगी माजी विरोधी पक्षनेते अशोक भाई कदम म्हणाले कि दादर गाव छोटे असले तरी मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेत याबाबत वर्णन केले तसेच ते म्हणाले की पाच सहा वर्षांपूर्वी जेव्हा दसपटी भागात नैसर्गिक आपत्ती झाली त्यावेळी दसपटी गावातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता त्यावेळी सुद्धा आमदार महोदय यांच्या विशेष प्रयत्नातून महत्त्वाचे ब्रिज देखील बांधण्यात आले. आमदार महोदय यांच्या प्रयत्नातून या भागातील गावामध्ये ओवाळी, नांदिवसे, रिकटोली, तिवरे या भागात धरणांची सुद्धा कामे अतिशय चांगल्या पद्धतीची चालू आहेत. या भागात असा विकास यापूर्वी कोणीही केला नाही असे म्हणाले. महिलांसाठी विशेष बचत गट इमारत होत असून बचत गटाच्या अध्यक्षा यांनी सुद्धा मनापासून आमदार महोदय यांची कौतुक केले. अमित कदम याप्रसंगी बोलताना म्हणाले की की जेव्हा जेव्हा दादर गावाला कोणत्याही विकास कामाची गरज होती ती मात्र तातडीने त्यांनी पूर्ण केली अप्रसंगी *आमदार महोदय शेखरजी निकम यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की दसपटी बरोबर दादर गावाचा विकास होणे अतिशय गरजेचे आहे गावची मतदार संख्या महत्त्वाची नसून गावातील लोकांची ज्या प्रकारची मागणी आहे त्या मागण्या पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे मतदान किती होते याची मला पाहत नाही अशाही प्रकारचे उद्गार त्याने काढले मी जनतेचा सेवक असून भविष्य सुद्धा अशाच प्रकारचा विकासासाठी प्रयत्नशील राहील या कार्यक्रमाप्रसंगी आमदार शेखरजी निकम,अशोक भाई कदम ,अमित कदम, पांडूशेठ माळी,स्वप्नील शिंदे , दिनेश शिंदे , कविता आंबेडे, प्रकाश शिंदे ,प्रदीप शिंदे ,अनंत सकपाळ ,प्रकाश पवार, सविता निकम, मानसिक कदम, सुरज पवार, प्रवीण पवार, वैशाली नलावडे, सुरेखा गमरे,जान्हवी सकपाळ,जागृती पवार,जगन्नाथ सकपाळ, विलास सकपाळ, जयश्री सकपाळ, संदीप पवार, विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Breaking News