रत्नागिरी :- काश्मीर मधील पहेलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करून 27 पर्यटकांचा बळी घेतला, त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही संविधान प्रेमी रत्नागिरीकर जयस्तंभ येथे सायंकाळी सात वाजता जमून 27 मेणबत्त्या लावून मृतांना आदरांजली वाहतो.
24 एप्रिल ते 20 मे पर्यंत जयस्तंभ येथे दररोज संध्याकाळी 7 वाजता ही आदरांजली वाहण्यात येत आहे.
तरी संविधान प्रेमी रत्नागिरीकरांनी 20 तारखेपर्यंत दररोज संध्याकाळी सात वाजता जयस्तंभ येथे येऊन आपली दहा मिनिटे द्यावी,ही विनंती.
