रत्नागिरीआरोग्य सेवा आपल्या दारी मजगांव येथे पिरॅमल स्वास्थ केंद्र तसेच रत्नागिरी जिल्हा...

आरोग्य सेवा आपल्या दारी मजगांव येथे पिरॅमल स्वास्थ केंद्र तसेच रत्नागिरी जिल्हा परिषदे मार्फत रुग्णांची तपासणी व उपचार

रत्नागिरी पासून जवळच असलेल्या मजगांव येथे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा तर्फे मजगांव येथील एहसास चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने पिरॅमल स्वास्थ केंद्रा मार्फत विनामूल्य रुग्ण तपासणी आणि रुग्णांना औषधोपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
आरोग्य कर्मचाऱ्यांचे एहसास ग्रुप तर्फे स्वागत करण्यात आले. या शिबीराचा सुमारे चाळीस रुग्णांनी लाभ घेतला. आरोग्य कर्मचारी शिवाणी कुचेकर , राहेल ख्रिश्चन, जर्नादन मठकर तसेच हजीब मुल्ला यांनी रुग्णांना उत्तम सेवा दिली.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक ताजुद्दीन खलफे, सिराज मुकादम तसेच एहसास ग्रुप च्या सभासदांनी मोलाचे कार्य केले. रुग्णांनी आयोजकांचे आभार मानले.

Breaking News