कोणा अज्ञlताने गावाच्या सिमेवर रस्त्यालगत फुलं लिंबू मिरच्या सह लाल कपड्यात गुंडाळालेली गठडी सापडली आहे
संगमेश्वर / सत्यवान विचारे
संगमेश्वर पासून 18 किमी अंतरावर असलेल्या स्वराज्याच्या महाराणी येशुबाई यांचे माहेर म्हणून ओळख असलेल्या शृंगारपूर गावाच्या सीमेवर रस्त्याच्या कडेला कोणा अज्ञlताने देव देवसकी सारखा प्रकार केल्याने शाळेय विद्यार्थ्यांमधे भीतीचे वातावरण पसरले आहे, तर याप्रकारा मुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकारlची मिळालेल्या माहिती नुसार गुरवारी ता, 13 रोजी नेहमी प्रमाणे शृंगारपूर,कातुर्डी येथील विध्यार्थी शाळेत निघाले असता नायरी शृंगारपूरच्या सिमेंवर रस्त्याच्या कडेला लिंबु, मिरच्या,अबीर, गुलाल पडलेला दिसला, तेथेच काही अंतरावर लाल कपड्यात चार गठडी बांधून टाकल्याचे दिसून आले.
हा सारा प्रकार त्या मुलांनी पाहताच त्या मुलांनी परत घराकडे धुम ठोकली.
शाळेतील मुलं भेदरलेल्या अवस्थेत परत आल्याचे पाहताच पालकांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता सर्व प्रकार मुलांनी पालकांना कथन केला.पालकांनी गावचे सरपंच श्री, विनोद पवार हे सायंकाळी घरी आले असता वरील प्रकार त्यांच्या कानी घातला.
एकूणच प्रकराचे गांभीर्य ओळखून गावचे सरपंच श्री, विनोद उर्फ बाबु पवार यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन प्रत्येक्ष पाहणी केली.
वरील प्रकार हा अघोरीं असल्याने सरपंच यांनी हा प्रकार संगमेश्वर पोलिसांना कळवला आहे.
शृंगारपूर सारख्या इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या गावाच्या वेशीवर असा देव देवस्की सारखा अघोरीं प्रकार घडल्याचे वृत्त परिसरात पसरताच संतापाची लाट पसरली आहे.
लाल कपड्यात बांधलेल्या त्या गाठोड्यात नेमके काय आहे याची तपासणी करुण त्या व्यक्तीचा शोध घ्यावा अशी ग्रामस्थ्यांची मांगणी आहे.