रत्नागिरीउद्योग दिशा कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

उद्योग दिशा कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

◾आज, रत्नागिरी येथे नारी शक्ती फाउंडेशन आणि लाईफ टाईम उद्योग समूह ह्यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी “उद्योग दिशा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

◾महिलांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वयं रोजगार, गृह उद्योग, बचत गटा मार्फत चालविण्यात येणारे उद्योग अशा विविध विषयांवर उपस्थित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

◾तसेच, भांडवल उभारणी, मार्केटिंग, शासकीय अनुदानित योजना अशा विविध विषयांचे ज्ञान देण्यात आले.

◾या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धनलक्ष्मी इंडस्ट्री चे सीईओ श्री संजय बगे, लाईफ टाईम उद्योग समूहाचे संस्थापक श्री सचिन माजळकर, सामाजिक कार्यकर्ते श्री राजू भाटलेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रताप पवार, ऍड. प्रतिभा पवार, रत्न सिंधू न्यूज मिडिया च्या वर्षा राजे निंबाळकर आदी उपस्थित होते.

◾नारी शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक संजना मोहिते, अंतरा मोहिते, पौर्णिमा सावंत, दिपाली कांबळे, सुप्रिया कांबळे, सलोनी मोरे यांनी खूप उत्तम प्रकारे नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमास १५० महिला तर हळदी कुंकू समारंभास ३५० महिलांनी उपस्थिती दर्शविली.

◾”महिलांना सक्षम होण्यासाठी असे उपक्रम खूप लाभदायक ठरतात. महिलांनी आज मिळालेल्या ज्ञानाने सोने करावे, स्वतः सक्षम होऊन, आपले घर व समाज सशक्त करावा.”
असे रत्नसिंधू न्यूज मिडियाच्या संस्थापिका/ संपादक, वर्षा राजे निंबाळकर म्हणाल्या.

Breaking News