एम. एस. नाईक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता १ ली ते ५ वीची पालक-शिक्षक सभा उत्साहात संपन्न
रत्नागिरी : एम. एस. नाईक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल, रत्नागिरी येथे इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांच्या पालक-शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सभेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांचा अभ्यास, उपस्थिती, शिस्त, वाचन-लेखन कौशल्य, गृहपाठ तसेच सहशालेय उपक्रमांतील सहभाग याबाबत पालकांना सविस्तर माहिती देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीबाबत शिक्षकांनी पालकांशी वैयक्तिक चर्चा करून आवश्यक मार्गदर्शन केले.यावेळी शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. आरिफा म्हालदार यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घर आणि शाळेतील समन्वयाचे महत्त्व, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती, अभ्यासातील सातत्य आणि पालकांच्या सहकार्याविषयी मार्गदर्शन केले.तसेच शिक्षिका श्रीमती सायली खरडे व श्रीमती शिल्पा फुटक यांनीही
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक व शिक्षक यांच्यात सातत्याने संवाद व समन्वय राहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.पालकांनी शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करून अशा सभा नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
एम. एस. नाईक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता १ ली ते ५ वीची पालक-शिक्षक सभा उत्साहात संपन्न
