रत्नागिरी- महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्य दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला हिन म्हणून साजरा करण्यात येतो.
या कार्यक्रमाला ‘नारी शक्ति’ एम. एस् नाईक स्कूल च्या मुख्याध्यापिक( प्राथमिक विभाग) सौ. अरिफा म्हालदार व शिक्षकवर्ग, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात परिपाठाला भाषणाद्वारे करण्यात आली. यामध्ये शिक्षकांनी सुद्धा सहभाग दर्शविला. व आपले विचार व्यक्त केले. यामध्ये मुलींसाठीच्या शासकीय योजना या संदर्भात माहीती देण्यात आली.
मुख्याध्यापिका सौ अरिफा म्हालदार यांनी या दिनानिमित्त विदयार्थ्यांना प्रोत्साहन देवून आपले विचार व्यक्त केले. शिक्षिका अपेक्षा पवार व महेक शेख यांनी मुलांना मार्गदर्शन केले. सौ दिक्षा दळवी यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
शाळेचे चेअरमन श्री. नौमान नाईक CEO श्री अकिब काझी व मुख्याध्यापक( माध्यमिक विभाग) श्री अश्फाक नाईक यांनी पार पडलेल्या कार्यक्रामातील विद्यार्थ्यी व शिक्षकांवे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या
