संगमेश्वरकडवई येथे विजेची तार पडून म्हैस दगावली. शेतकऱ्याचे एक लाखाचे नुकसान.

कडवई येथे विजेची तार पडून म्हैस दगावली. शेतकऱ्याचे एक लाखाचे नुकसान.

शास्त्रीपूल.. वार्ताहर :

संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे ग्रामदेवता मंदिराजवळ काल संध्याकाळी ७ वाजता विजेची वायर तुटून अंगावर पडल्याने कोंडू बिरु जांगली यांच्या मालकीची गाभण म्हैस दगावल्याची घटना घडली. यामध्ये जांगली यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले .कडवई ग्रामदेवता मंदिर येथे धरणाजवळ काल संध्याकाळी कोंडू जांगली हे आपली गुरे घेऊन जात असताना विजेची तार तुटून त्यांच्या गाभण म्हशीच्या अंगावर पडली व म्हैस तडफडू लागली. हे पाहून जांगली हे म्हशीजवळ गेले परंतु काळोख असल्याने तुटलेली वायर दिसून येत नव्हती . प्रसंगावधान राखत ते मागे सरकल्याने अनर्थ टळला .
म्हैस दगावल्याची माहिती मिळताच तुरळ शाखेचे कनिष्ठ अभियंता वीरेंद्र सकपाळ , कर्मचारी सचिन कुंभार, अक्षय कांबळे , युवराज गायकवाड यांनी घटनास्थळी येत वीजप्रवाह बंद करून पाहणी केली . आज सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी चारुदत्त बेलुरे यांनी शवविच्छेदन केले. तर ग्राम महसूल अधिकारी विठ्ठल सराई , उपसरपंच दत्ताराम ओकटे, पोलीस पाटील संजय ओकटे व अभियंता वीरेंद्र सकपाळ यांच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करण्यात आला . यावेळी एक लाखाचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले . सदर शेतकऱ्यास लवकरात लवकर योग्य ती नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे .

Breaking News

Play Through Free Spins Without Wasting Winnings

Play Through Free Spins Without Wasting WinningsPlay Through Free...